Home /News /videsh /

भिकेचे डोहाळे! महिन्याला 77 लाख पगार घेणाऱ्या भारतीयाने चोरलं सँडविच

भिकेचे डोहाळे! महिन्याला 77 लाख पगार घेणाऱ्या भारतीयाने चोरलं सँडविच

सँडविच चोरीचा आरोप झालेली व्यक्ती ब्रिटनमधील एका सिटी बँकेत काम करत असून भारतीय वंशाची आहे. या प्रकरणी निलंबनाची कारवाईसुद्धा करण्यात आली आहे.

    ब्रिटन, 04 फेब्रुवारी : एका महिन्याला 77 लाख रुपये पगार असलेल्या माणसाने सँडविच चोरी केली हे पटत नसलं तरी खरं आहे. ब्रिटनमधील एका सिटी बँकेत काम करणाऱी ही व्यक्ती भारतीय वंशाची आहे. या प्रकरणी त्याच्यावर निलंबनाची कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. पारस शहा असं नाव असलेल्या या व्यक्तीला वार्षिक एक मिलियन पाउंड पॅकेज मिळते. या हिशोबानुसार त्याला महिन्याला 77 लाख रुपये इतका पगार मिळतो. बँकेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की, पारस शहावर याआधीही खाणं चोरल्याचा आरोप होता. या प्रकरणावर ब्रिटीश वृत्तपत्र फायननान्शिअर टाइम्सने बातमी दिली आहे. पारसने आतापर्यंत कितीवेळा सँडविच चोरलं याची माहिती मात्र समोर आली नाही. पारस शहा युरोपातील सर्वात मोठ्या अशा क्रेडिट ट्रेडर्समध्ये स्थान दिलं जातं. त्याने कमी वयातच मोठी झेप घेतली पण आता या आरोपामुळे तो अडचणीत येण्याची शक्यता आहे. सध्या फक्त आरोपाच्या आधारवर त्याचं निलंबन करण्यात आलं आहे. माध्यमात या प्रकरणाला प्रसिद्धी मिळाल्यानंतर याकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे. महिन्याला 77 लाख रुपये पगार मिळणारी व्यक्ती सँडविचची चोरी का करेल असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याबद्दल अद्याप काही समजलेलं नाही. आरोप सिद्ध झाल्यास पारसला मोठा फटका बसू शकतो. वाचा : 1 लाख कोटींचा टर्नओव्हर असलेल्या फेसबुककडून CEO झुकेरबर्गला मिळतो इतका पगार सध्या 31 वर्षांचे असलेल्या पारस शहाने 2010 मध्ये ब्रिटनच्या बाथ युनिव्हर्सिटीत अर्थशास्राची पदवी घेतली. त्यानंतर एचएसबीसी बँकेत कामाला सुरुवात केली. सात वर्षे त्या ठिकाणी काम केल्यानंतर त्याने मोठ्या पदावंर काम केलं. 2017 मध्ये सिटी बँकेत नोकरीला लागला. गेल्या तीन वर्षांपासून बँकेच्या क्रेडिट ट्रेडिंग विभागात काम करणारा पारस युरोप, मध्य आशिया आणि आफ्रिकेचा प्रमुख होता. बँकेत नोकरीची संधी, 31 ते 51 हजार रुपये मिळणार पगार
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Britain

    पुढील बातम्या