Home /News /videsh /

कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जगातल्या मोठ्या बँकेचे बुडाले 6 हजार 700 कोटी, भारतावर होणार परिणाम?

कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जगातल्या मोठ्या बँकेचे बुडाले 6 हजार 700 कोटी, भारतावर होणार परिणाम?

रेवलॉन कंपनीचं दिवाळं निघाल्याचं जाहीर झालं आहे. त्यामुळे हे पैसे कसे वसूल करायचे असा मोठा प्रश्न बँकेसमोर निर्माण झाला आहे.

    न्यूयॉर्क 17 ऑगस्ट:  बँकांनी ग्राहकांच्या खात्यात जास्त रक्कम टाकल्याच्या घटना अनेकदा बाहेर आल्या आहेत. मात्र एखाद्या मोठ्या कंपनीला दिलेल्या कर्जाची रक्कम अनेकांच्या खात्यात गेल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेत घडला आहे. सीटी बँकेच्या कर्ज देणाऱ्या विभागातल्या एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे बँकेला तब्बल 90 कोटी डॉलर्स म्हणजे अंदाजे 6 हजार 700 कोटींचा फटका बसला आहे. या बँकेच्या भारतातही शाखा आहेत. मात्र त्याचा  काहीही परिणाम भारतीय ग्रहकांवर होणार नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. सीटी बँकेने कॉस्‍मेटिक्‍स बनविणारी कंपनी रेवलॉनला (Revlon) 90 कोटी डॉलर्सचं कर्ज दिलं होतं. बँकेने ते कर्ज त्यांच्या खात्यात न ट्रान्सफर करता अन्य कर्जदारांच्या बँक खात्यात वळतं केलं. आता ते सर्व कर्जदार पैसे परत करायला तयार नाहीत. तर रेवलॉन कंपनीचं दिवाळं निघाल्याचं जाहीर झालं आहे. त्यामुळे हे पैसे कसे वसूल करायचे असा मोठा  प्रश्न सीटी बँकेसमोर निर्माण झाला आहे. आता कोरोनापेक्षाही भयंकर D614G व्हायरसची झाली एण्ट्री! 10 पट जास्त वेगानं पसरतो बँकेने केलेल्या प्रयत्नानंतर काही रक्कम परत मिळवली गेली आहे. मात्र उरलेल्या पैशांचं काय करायचं असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कोरोनामुळे आर्थिक व्यवहार थंडावलेले आहेत. लोकांचा कर्ज घेण्याकडे कल कमी आहे. आणि असलेले कर्ज फेडण्याची ताकदही अनेक लोकांकडे नाही त्यामुळे पैशांचं गणित कसं जुळवायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालाय. रशियाचं भयानक स्लीप एक्सपरिमेंट; कैद्यांनी खाल्लं होतं आपल्याच शरीराचं मांस जगात सर्वात जास्त कोरोनाचा फटका हा अमेरिकेला बसला असून इतिहासातली सर्वात मोठी बेरोजगारी निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसलाय.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या