Home /News /videsh /

CIA ने ट्विटरवर घातलं कोडं, सोडवणाऱ्यांना दिली नोकरीची ऑफर

CIA ने ट्विटरवर घातलं कोडं, सोडवणाऱ्यांना दिली नोकरीची ऑफर

अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए (CIA) देखील ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते. अनेकदा आपल्या फॉलोअर्सला बांधून ठेवण्यासाठी सीआयए कोडे टाकत असतात. नुकतेच त्यांनी एक ट्विट केले असून यामध्ये आपल्या फॉलोअर्सला नवीन कोडे टाकले आहे.

पुढे वाचा ...
    वॉशिंग्टन, 4 डिसेंबर : ट्विटरवर वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर सगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना फॉलो करून तुम्ही त्यांच्याकडून ज्ञान देखील मिळवू शकता. याचसोबत वेगवेगळी मिम्स आणि कोडीदेखील ट्विटरवर अनेकदा पाहायला मिळतात. ट्विटरवरील युजर्सचा याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने विविध प्रकारची कोडी व्हायरल होत असतात. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए (CIA) देखील ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते. अनेकदा आपल्या फॉलोअर्सला बांधून ठेवण्यासाठी सीआयए कोडे टाकत असतात. नुकतेच त्यांनी एक ट्विट केले असून यामध्ये आपल्या फॉलोअर्सला नवीन कोडे टाकले आहे. यामध्ये त्यांनी शहरात हिमवर्षाव होत असून यामध्ये हे शहर आणि त्याची वेळ ओळखण्याचं नवीन कोडं टाकलं आहे. हा फोटो टॉप अँगलनी घेतलेला असून येथील घरे, बिल्डिंग आणि गाड्या दिसत आहेत. या गाड्यांवर बर्फाचा जाड थर देखील दिसून येत आहे. सीआयएने टाकलेल्या या फोटोमध्ये कोणतीही व्यक्ती दिसत नाही. सीआयएने त्यांच्या फॉलोअर्सना या फोटोची वेळ ओळखायला सांगितली आहे. यासाठी त्यांनी सकाळचे सात, अकरा आणि दुपारचे तीन या वेळा दिल्या आहेत. मंगळवारच्या ट्रीव्हिया कॉलममध्ये त्यांनी ही पोस्ट केली असून यामध्ये कौशल्य पणाला लावून या फोटोमधील वेळ ओळखा? असे कोडे घातले आहे. हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपले डोके लढवत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जवळपास 16 हजार मतं आणि 53 टक्के नागरिकांनी ही सकाळची सातची वेळ असल्याचे म्हटले आहे. यामध्ये काहींनी आपल्या उत्तराचे स्पष्टीकरण देखील दिले आहे. यामध्ये एकाने लिहिले, पार्किंगमधील गाड्यांवर मोठ्या प्रमाणात बर्फ दिसत आहे. लांब सावल्या दिसून येत आहेत. त्याचबरोबर रस्त्यावर एकही पादचारी दिसत नाही. त्यामुळे ही सकाळची वेळ असल्याचा माझा अंदाज आहे. एकाने ही दुपारी तीनची वेळ असल्याचे सांगत गाड्या उघड्या दुकानांसमोर असल्याचे म्हटले आहे. रस्त्यावरून खूप वाहने गेल्याचे दिसून येत असून, रिकाम्या बसदेखील शाळा बंद होऊन विद्यार्थ्यांची वाट पाहत आहेत, असे स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये CIA ने प्रत्युत्तर देताना अनेकजणांनी बरोबर उत्तरे दिली असून त्यांच्या करिअर पेजला भेट देण्याचे देखील म्हटले आहे. त्याचबरोबर यामधील कितीजण CIA मध्ये पे रोलवर नोकरी मिळवू शकतात, याचा आम्हाला अंदाज नाही. परंतु नेटिझन्सनी डोळ्यात तेल घालून हे कोडे सोडवले असल्याचे म्हटले आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या