
चॉकलेट आवडणार नाही असा जगात माणूसच सापडणार नाही. प्रत्येकाला हवंहवसं वाटणाऱ्या चॉकलेटवर आता संक्रांत येण्याची शक्यता आहे. त्याचं कारण वाचून सगळ्यांनाच धक्का बसण्याची शक्यता आहे.

जगात सर्वात जास्त चॉकलेट ज्या देशांमध्ये खपतं त्यात भारताचा समावेश आहे. भारतात कोकोचं उत्पादनही होतं मात्र ते निर्यात केलं जातं.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे जी पीकं संपण्याचा धोका व्यक्त केला जातोय त्यात कोकोचाही समावेश आहे. त्यामुळे चॉकलेट प्रेमींना थोडा धक्का बसू शकतो.

अमेरिकेच्या ओसिएनिक अँड एटमोसफेयरिंक अडमिनिस्ट्रेशनच्या अहवालात यासंबंधात माहिती देण्यात आली आहे. पुढच्या 40 वर्षांमध्ये कोकोचं पीक संपणार असल्याचा अंदाज त्यात व्यक्त केला आहे.

भारतात 2002मध्ये 1.64 लाख टन चॉकलेटची विक्री झाली होती. 2013 त्यात वाढ होऊन ती 2.28 लाख टनांवर गेली. आता त्यात आणखी वाढ झाली आहे.

वाढती लोकसंख्या आणि प्रदुषणामुळे पृथ्विचं तापमाण वाढत आहे. पुढच्या 30 वर्षांमध्ये त्यात 2.1 डिग्री सेल्सियसची वाढ होणार आहे.

त्याचा थेट परिणाम चॉकलेट उत्पादकांवर होणार आहे. कोकोच्या झाडांसाठी विशिष्ट तापमानाची गरज असते. तेच तापमान मिळणार नसेल तर कोकोचं पिकच येणार नाही असा अंदाज व्यक्त केला जातोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.