4 महिन्यापासून कोमात होती चीनची महिला, 'हे' गाणं ऐकून आली शुद्ध

संगीत ऐकल्यानं आरोग्य सुधारते हे आपण ऐकलं आहे. पण त्याचा प्रत्यय काही रोज येत नाही. पण याचा अनोखा प्रत्यय चीनमध्ये आला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 14, 2018 06:00 PM IST

4 महिन्यापासून कोमात होती चीनची महिला, 'हे' गाणं ऐकून आली शुद्ध

14 मे : संगीत ऐकल्यानं आरोग्य सुधारते हे आपण ऐकलं आहे. पण त्याचा प्रत्यय काही रोज येत नाही. याचा अनोखा प्रत्यय चीनमध्ये आला आहे. चीनच्या एका 24 वर्षीय महिला या ताइवानी पॉपस्टार जय चाओचं गाणं ऐकल्यानंतर चक्क कोमातून बाहेर आल्या आहेत. असं वृत एका चिनी वृत्तपत्रात छापून आलं आहे.

या वृत्तानुसार असं सांगण्यात आलं आहे की, नोव्हेंबर 2017पासून ऑक्सिजनच्या अभावामुळे या महिला ब्रेन डिस्फंक्शनने आजारी होत्या. तेव्हापासून त्या कोमात होत्या. दरम्यान, त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या नर्स नेहमी त्यांना विनोद आणि मनोरंजनाच्या गोष्टी सांगायच्या. पण त्यांच्याकडून काहीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

या महिलेची काळजी घेणाऱ्या नर्सला जय चाओची गाणी ऐकण्याची आवड होती. आणि हीच गाणी त्यांनी आजारी महिलेला ऐकवली. आणि या संगीताने जादूच केली असं म्हणायला हरकत नाही. 4 महिन्यापासून कोमात असलेली महिला जय चाओचं गाणं ऐकून कोमातून बाहेर आल्या आहेत.

खालीलप्रमाणे हेच ते गाणं, जे ऐकून त्या महिला कोमातून बाहेर आल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2018 06:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close