वॉशिंग्टन 15 मे: अमेरिका आणि चीनमधला वाद आणखी चिघळला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन विरुद्ध आणखी कठोर भूमिका घेतला आहे. चीनी शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला अमेरिकेचा पेंशन निधि (US Pension Fund) काढून घेण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेने चीनी मार्केटमध्ये अब्जावधी डॉलर्स गुंतवले होते. आता तो निधीच काढून टाकण्याची अमेरिकेने घोषणा केल्याने चीनी शेअर बाजाराला प्रचंड मोठा हादरा बसला आहे. जागतिक महसत्ता असेलेली अमेरिका आणि महाबलाढ्य देश आणि बाजारपेठ असलेला चीन यांचे स्परस्पर असेलेल्या आर्थिक संबंधांवर हे सर्व जगाचं अर्थ कारण अवलंबून आहे. आता या निर्णयाचा फटका चीनला बसणार असून वाद चिघळण्याची शक्यता आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या निर्णयाची माहिती दिली. चीनची भूमिका बदलली नाही तर चीनसोबतचे सर्व संबंधच तोडून टाकण्याची धमकीही त्यांनी दिली होती.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला पुन्हा एकदा कठोर धमकी दिलीय. परिस्थिती अशीच राहिली तर अमेरिका चीन विरुद्ध कठोर पावलं उचलू शकते असं ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. म्हणजे अमेरिका नेमकं काय करणार असं विचारल्यावर ट्रम्प म्हणाले, अमेरिका चीनसोबतचे सर्व संबंध तोडून टाकू शकते. ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
ट्रम्प हे वारंवार चीनविरुद्ध वक्तव्य करत असून चीननेच हा व्हायरस पसरवला असा त्यांचा आरोप आहे. मात्र चीनने अमेरिकेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
भारताशी पंगा पाकला पडला महागात, 'या' निर्णयामुळं इमरान खान सरकार पडणार तोंडघशी
दरम्यान, चीनच्या वुहानपासून जगभरात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना पसरण्यास सुरुवात झाली. चार महिन्यांनंतरही कोरोनावर कोणतीही लस किंवा ठोस उपाय शोधता आलेला नाही आहे. यातच जागितक आरोग्य संघटनेने (WHO) काही दिवसांपूर्वी लवकरच कोरोनाची लस मिळेल, असे सांगत एक आशेचा किरण दाखवला.
सर्वात मोठं यश! 24 शास्त्रज्ञांनी शोधला कोरोनाला मारण्याचा यशस्वी फॉर्म्युला
मात्र आता WHOने कोरोना कधीच नष्ट होणार नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. WHOने स्पष्ट केले आहे की, असेही होऊ शकते की कोव्हिड-19 कधीच नष्ट होणार नाही. त्याच्यासोबत जगायची सवय लावून घ्यावी लागेल.
President @realDonaldTrump: "Every other President let China do whatever they wanted." pic.twitter.com/jEffuEFUlv
— The White House (@WhiteHouse) May 14, 2020
अमेरिकेच्या अनेक बड्या दिग्गज कंपन्यांनी चीनमध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे चीन आता कुठला निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.