बिजिंग, 11 नोव्हेंबर : Worlds Largest Shopping Festival चीनमध्ये (China) जगातील सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल सुरू आहे. या फेस्टिव्हलला 11/11 किंवा 'सिंगल्स डे फेस्टिवल (Singles' Day Festival) या नावानेही ओळखलं जातं. त्याशिवाय याला सिंगल्स डे ऑनलाईन शॉपिंग असंदेखील बोललं जातं. चीनी ग्राहकांकडून यावर्षी 'सिंगल्स डे ऑनलाइन शॉपिंग फेस्टिवल' मध्ये खाण्याच्या वस्तूंपासून ते लग्जरी सामानापर्यंत (Luxury Product) करोडो रुपये खर्च केले जाण्याची अपेक्षा केली जात आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे (Corona virus) बाजार थंड पडले आहेत. या वार्षिक फेस्टिव्हलमध्ये चीनच्या ई-कॉमर्स कंपन्या अलीबाबा, जेडी डॉट कॉम आणि पिनडुओडो ग्राहकांना मोठी सूट देत आहेत.
शॉपिंग फेस्टिव्हलदरम्यान 11 नोव्हेंबर रोजी सर्वात मोठी सेल लागतो. ज्यात ग्राहकांना वस्तूंवर मोठ-मोठे डिस्काउंट्स दिले जातात. 11 नोव्हेंबरच्या या खास सेलला 'सिंगल डे सेल'ही म्हटलं जातं.
कंसल्टिंग फर्म ओलिवर वायमनद्वारे केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, 86 टक्के चीनी ग्राहक गेल्या वर्षीच्या सिंगल डे फेस्टिव्हलच्या तुलनेत यावर्षी अधिक खर्च करण्याची शक्यता आहे. गेल्या सहा महिन्यात काही श्रीमंत कुटुंबांनी अधिक पैसा खर्च केल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय प्रवासावरील प्रतिबंधामुळे, देशात लग्जरी उत्पादकांच्या खरेदीतही वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
कन्सल्टिंग फर्म बॅन अँड कंपनीच्या एका रिपोर्टनुसार, या वर्षीच्या फेस्टिव्हल डेमध्ये इलेक्ट्रिक सामान, आरोग्य आणि वेलनेस उत्पादनांची अधिक विक्री होण्याची शक्यता आहे. चीनमध्ये अधिकतर लोक work from home करत आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यबाबत सतर्क असणाऱ्या लोकांकडून अशा वस्तूंची मोठी खरेदी केली जात आहे. ऑनलाईन विक्री वाढवण्यासाठी यावर्षी या फेस्टिव्हलचा कालावधी वाढवण्यात आला आहे.