चीनमध्ये क्लोनिंगने झाली माकडांची निर्मिती

नवं नवे विक्रम करणाऱ्या चीनच्या शास्त्रज्ञांनी क्लोनिंगव्दारे दोन माकडांची निर्मिती केली आहे. क्लोनिंगव्दारे जन्माला आलेली ही दोन्ही मादी पिल्लं आहेत

Chittatosh Khandekar | Updated On: Jan 28, 2018 03:58 PM IST

चीनमध्ये क्लोनिंगने झाली माकडांची निर्मिती

28 जानेवारी  2018: एकीकडे  भारताचे केंद्रीय मंत्री  सत्यपाल सिंह माकड  आणि डार्विनवर आक्षेपार्ह  टीका  करत असताना दुसरीकडे शेजरील  चीनच्या शास्त्रज्ञांनी क्लोनिंगव्दारे दोन माकडांचीच निर्मिती केलीय. अशा प्रकारचा जगातला हा पहिलाच प्रयत्न असून अनेकांनी यावर टीकाही केली आहे.

नवं नवे विक्रम करणाऱ्या चीनच्या शास्त्रज्ञांनी क्लोनिंगव्दारे दोन माकडांची निर्मिती केली आहे.  क्लोनिंगव्दारे जन्माला आलेली ही दोन्ही मादी पिल्लं आहेत. 'सोमॅटिक सेल ट्रान्सफर' या टेक्निकव्दारे हे क्लोनिंग करण्यात आलंय. अशा प्रकारचा जगातला हा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा शांघायच्या सायन्स अॅकेडेमीनं केलाय.

आठ आणि सहा आठवड्यांच्या या पिल्लांची प्रकृती सध्या उत्तम आहे.  झोंग झोंग आणि हुआ हुआ अशी या पिल्लांची नावंही ठेवण्यात आलीय. सुदृढ माकडीणीच्या अंडकोशातून पेशी घेऊन दुसऱ्या माकडाच्या पेशीसोबत त्याचं फलन करण्यात आलं आहे. नंतर ते भ्रुण एका मादीच्या गर्भात ठेवण्यात आलं. गेल्या वर्षभरापासून शास्त्रज्ञ या प्रकल्पावर काम करत होते. चीनच्या शास्त्रज्ञांचं हे मोठं यश मानलं जातंय.

तर चीनी शास्त्रज्ञांच्या या क्लोनिंगवर जगभरातून टीकाही होतेय. अशा प्रकारचं क्लोनिंग हे मानवतेसाठी घातक असल्याचं व्हॅटीकनने म्हटलंय. तर अशा तंत्रज्ञानातून मानवी क्लोनिंग करणार नसल्याचं चीनच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2018 03:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close