वैज्ञानिकांचा सर्वात मोठा दावा, वुहानआधीच युरोपातील 'या' 6 शहरांमध्ये सापडला होता कोरोना

वैज्ञानिकांचा सर्वात मोठा दावा, वुहानआधीच युरोपातील 'या' 6 शहरांमध्ये सापडला होता कोरोना

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी देखील म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा अभ्यास शास्त्रज्ञांनी जागतिक स्तरावर केला पाहिजे.

  • Share this:

वुहान, 09 जुलै : जगभरात एक कोटींहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. कोरोनाचा प्रसार कुठून झाला, याबाबत अद्यापही नेमकी कोणालाही माहित नाही. चीनच्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचा आरोप जगभरातील सर्व देशांनी केला आहे. मात्र आता वैज्ञानिकांनी एक वेगळाच दावा केला आहे. चीनच्या शास्त्रज्ञांच्या मते वुहानआधी युरोपियन देशांमध्ये कोरोना सापडला होता. चिनी वैज्ञानिकांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा जागतिक आरोग्य संघटना (WHO) टीम चीनमधील कोरोना विषाणूचे मूळ ठिकाण शोधण्यासाठी दाखल झाली आहे.

चीनमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि श्वसन रोगांचे तज्ज्ञ डॉ. झॉन्ग नैनशैन यांनी चिनी सरकारी माध्यम ग्लोबल टाईम्सला दिलेल्या माहितीत, कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वी त्याचे काही अंश हे युरोपियन देशांमध्ये सापडले होते.

डॉ झॉन्ग यांनी सांगितले की इटली, मिलान, ट्यूरिन, पॅरिससह अनेक युरोपियन देशांच्या सांडपाण्यातून कोरोनाचा संसर्ग झाला. याचा अर्थ असा की हा विषाणू तेथे आधीच अस्तित्त्वात होता. हा विषाणू बर्‍याच वर्षांपासून युरोपियन देशांमध्ये आहे. ही वेगळी बाब आहे की कोरोना विषाणूचा सर्वात गंभीर हल्ला प्रथम चीनच्या वुहानमध्ये झाला.

वाचा-कोरोनाच्या संकटात बीडमध्ये वकिलांनीच मोडला कायदा, 11 जणांना अखेर दणका

डॉ झॉन्ग यांनी सांगितले की कोरोना विषाणूचा युरोपियन देशांमध्ये आधीच अस्तित्त्वात आला आहे याचे पुष्कळ पुरावे आहेत. पण हे कुणाच्याही लक्षात आले नाही. दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी देखील म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा अभ्यास शास्त्रज्ञांनी जागतिक स्तरावर केला पाहिजे. सर्व देशांनी यात सहकार्य केले पाहिजे. हे कदाचित कोरोनाचा मूळ हा इतर काही ठिकाण असेल.

वाचा-काय सांगता? मीट किंवा फ्रोजन चिकनवर 15 दिवस जिवंत राहातो कोरोना

युरोपियन देशांच्या सांडपाण्यात सापडला कोरोना

झाओ म्हणाले की, चीननंतर WHO टीम इतर अनेक देशांमध्ये जाऊन कोरोना विषाणूचे मूळ शोधू शकते. कारण, डिसेंबर 2019 मध्ये, मिलान आणि ट्यूरिनच्या सांडपाण्यात कोरोना सापडल्याचे काही पुरावे आहेत. 31 डिसेंबर 2019 रोजी चीनमधील कोरोनाची पहिली केस नोंदवली गेली. त्याच वेळी, जानेवारी 2020 च्या उत्तरार्धात युरोपीय देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला.

वाचा-धक्कादायक! तपासणी सुरू असताना 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाले, तालुक्यात खळबळ

Published by: Priyanka Gawde
First published: July 9, 2020, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading