Home /News /videsh /

10 मिनिटात दीड लिटर Coca Cola प्यायला; पोटात भरपूर गॅस झाला आणि घडली भयंकर घटना

10 मिनिटात दीड लिटर Coca Cola प्यायला; पोटात भरपूर गॅस झाला आणि घडली भयंकर घटना

यानंतर अचानक त्याच्या हृदयाचे ठोके वाढले आणि त्याचा रक्तदाब फार कमी झाला. त्याचा श्वासही खूप तीव्र झाला. ओटीपोटात तीव्र वेदना होऊ लागल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : कोल्डड्रिंक्स प्यायला अनेकांना आवडते, काहीजण फॅशन म्हणून कोल्डड्रिंक्स पितात. अनेकांना कोल्डड्रिंक्स प्यायची सवय झालेली असते, त्यातून शरीराला विशेष घटक मिळत नसले (Effects Of Cold drinks) तरी लोक ते पित राहतात. जगभरातील, विशेषत: ब्रिटनमधील लोकांच्या दैनंदिन आहारात शीतपेयांचा समावेश केला जातो. बरेच लोक दररोज अनेक लिटर शीतपेये पितात. पण अलीकडेच चीनमधून आलेल्या एका बातमीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. या कोल्ड ड्रिंकमुळे तेथे राहणाऱ्या एका मुलाचा मृत्यू झाला. त्या मुलाने फक्त 10 मिनिटात दीड लिटर कोका कोला (Coca Cola) प्यायला होता. यामुळे त्याच्या शरीरात भरपूर गॅस तयार झाला आणि त्याचा मृत्यू झाला. चीनच्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, एका मुलाचा कोल्ड ड्रिंक पिऊन मृत्यू झाला. त्याने 10 मिनिटांत दीड लिटर कोकाकोला (Man Drinks 1.5 Liter Coca Cola) प्यायला होता. त्याला खूप उकाडा जाणवत होता, म्हणून त्याने कोका-कोलाची दीड लिटरची बाटली विकत घेतली आणि ती संपूर्ण प्यायली. ज्यामुळे त्याच्या जास्त शरीरात गॅस तयार झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या 22 वर्षीय तरुणाला कोबेइजिंगच्या चाओयांग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोल्ड ड्रिंक पिण्याच्या 6 तासांच्या आत त्याच्यावर भयंकर परिणाम झाला. हे वाचा - सतत Bluetooth किंवा Wireless Headphones चा वापर करताना सावधान, होऊ शकतो गंभीर आजार वाईट स्थितीत रुग्णालयात दाखल असे सांगितले जात आहे की, चीनमध्ये आजकाल उकाडा खूप वाढला आहे. या कारणास्तव, या तरुणाने दीड लिटर कोका कोलाची बाटली विकत घेतली आणि ती संपूर्ण पिऊन टाकली. यानंतर अचानक त्याच्या हृदयाचे ठोके वाढले आणि त्याचा रक्तदाब फार कमी झाला. त्याचा श्वासही खूप तीव्र झाला. ओटीपोटात तीव्र वेदना होऊ लागल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याचा मृत्यू झाला. पोटात गॅस तयार झाल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हे वाचा - IPL 2021: CSK च्या ‘या’ खेळाडूशी धोनीचं दरवर्षी होतं भांडण, माहीनं स्वत: सांगितलं वादाचं कारण पोटाची भयानक स्थिती होती क्लिनिक आणि रिसर्च इन हेप्टोलॉजी आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीच्या तज्ञांच्या मते, कोल्ड ड्रिंक्स वारंवार पिल्याने त्याच्या आतड्यांमध्ये गॅस तयार झाला. यासोबतच पोटाच्या अन्ननळीतही गॅस शिरला होता. यामुळे त्याच्या यकृताला ऑक्सिजन पुरवता आला नाही. ज्यामुळे यकृताला धक्का बसला आणि त्याने आपला जीव गमावला. त्या तरुणाचा अवघ्या 18 तासात मृत्यू झाला. मात्र, डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनचे प्राध्यापक नाथन देविस यांच्या मते, कोकाकोला दीड लिटर पिऊन कोणाचा मृत्यू होणे शक्य नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: China, Shocking news

    पुढील बातम्या