बापरे!,आॅनलाईन केली सापाची आॅर्डर, बाॅक्स उघडला अन्...

बापरे!,आॅनलाईन केली सापाची आॅर्डर, बाॅक्स उघडला अन्...

या तरुणीनं पारंपारिक सापाद्वारे तयार होणाऱ्या दारूसाठी चक्क एका सापाची आॅनलाईन आॅर्डर दिली होती.

  • Share this:

चीन, 23 जुलै : चीनमध्ये एका तरुणीनं आॅनलाईन सापाची आॅर्डर दिली. पण हीच आॅर्डर तिच्या जीवावर बेतली. या तरुणीनं पारंपारिक सापाद्वारे तयार होणाऱ्या दारूसाठी चक्क एका सापाची आॅनलाईन आॅर्डर दिली होती. पण या सापाने दंश केल्यामुळे या तरुणीचा मृत्यू झालाय.

सिन्हुआ न्यूज संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार,  21 वर्षीय या तरुणीने मागील आठवड्यात मंगळवारी आॅनलाईन वेबसाईट झुआनझुआनवरून एका सापाची आॅर्डर दिली होती. या सापाची आॅर्डर स्थानिक कुरिअर कंपनीने वेळेवर डिलिव्हरी केली. डिलिव्हरी देताना बाॅक्समध्ये साप असल्याचं या कंपनीला माहिती नव्हते.

मराठा मोर्च्याची मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक

जेव्हा या तरुणीने हा बाॅक्स उघडला आणि साप बाहेर येऊन त्याने दंश घेतला. मृत तरुणीच्या आईने सांगितलं की, पारंपारिक स्नेक वाईन तयार करण्यासाठी या सापाची आॅर्डर दिली होती. वन अधिकाऱ्यांनी तिच्या घरापासून काही अंतरावर या सापाला पकडलं.

डेव्हिड हेडलीवर अमेरिकेतल्या तुरूंगात हल्ला, प्रकृती गंभीर

या घटनेनंतर आॅनलाईन प्लॅटफाॅर्मवरून सापासारख्य़ा विषारी प्राणी मागवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

First published: July 23, 2018, 11:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading