देशी 'छोले भटुरे' चिनी शेफनं अमेरिकेत 'या' नावाने विकले!

देशी 'छोले भटुरे' चिनी शेफनं अमेरिकेत 'या' नावाने विकले!

आपल्या भारताचा आवडता आणि सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ असा वेगळ्या नावानं विकला जातोय. यावर भारतीयांनी सोशल मीडियावर चांगलाच विरोध केला.

  • Share this:

07 फेब्रुवारी : भारतात आणि खासकरून राजधानी दिल्लीत एकातरी दुकानात आपल्या छोले भटुऱ्यांचा स्वाद चाखायला मिळणारच. 20 आणि 30 रुपयांमध्ये अगदी सहज मिळणारा हा पंजाबी पदार्थ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. कारण अमेरिकेत एक चिनी शेफ आपल्या भारतीय छोले भटुऱ्यांना 'स्कॅलियन बबल पॅनकेक्स' या नावानं विकतोय.

अगदी जगप्रसिद्ध आणि आवडीने खाल्ला जाणार हा पदार्थ छोले भटुरे या नावाने ओळखला जातो. पण अमेरिकेच्या मॅरिलँडमध्ये चिनी शेफ पीटर चँग आपल्या स्वत:च्या नावाने हा पदार्थ विकत आहे. पीटर चँग हा मॅरिलँडमधल्या एका हॉटेलचा मालक आहे. आपले छोले भटुरे तो स्कॅलियन बबल नावाने स्टार्टरमध्ये वापरतो.

आपले हे देशी भटुरे चँग चटणी सोबत खायला देतो. पण आपल्या भारतात ते छोलेसोबत खायला मिळतात. खरं तर जेव्हा हे प्रकरण एका फूड वेबसाईटवरून सोशल मीडियावर व्हायरल झालं तेव्हा भारतीयांनी याला जोरदार विरोध केला. आपल्या भारताचा आवडता आणि सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ असा वेगळ्या नावानं विकला जातोय. यावर भारतीयांनी सोशल मीडियावर चांगलाच विरोध केला. आणि मग काय त्या वेबसाईटला हा व्हिडिओ काढून टाकावा लागला.

 

First published: February 7, 2018, 12:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading