मुंबई, 12 सप्टेंबर : संपूर्ण जगभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. चीनमधूनच कोरोनाचा व्हायरसचा इतर देशात संसर्ग वाढला असा दावा केला जात आहे. पण, आता चीनच्या एका महिला शास्त्रज्ञाने कोरोनाचा विषाणू हा प्राणी निर्मित नसून मानवनिर्मित असल्याचा दावा केला आहे.
दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत असलेल्या व्हायरोलॉजिस्ट ली-मेंग यान यांनी आपल्याच देशाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. कोरोना व्हायरस हा वटवाघुळामुळे झाला असल्याचं आतापर्यंत सांगण्यात आले आहे. पण हा व्हायरस वटवाघुळापासून नाहीतर मानवापासून तयार झाला आहे, असा दावा ली-मेंग यान यांनी केला आहे.
पोलिसांची कमाल! हरवलेल्या मुलाला गुगल मॅपवरून 24 तासांत शोधलं
एवढंच नाहीतर, चीन सरकारने कोरोनाबद्दल बरीच माहिती ही लपवून ठेवली आहे. चीनमध्येच हा व्हायरस तयार झाला असून तो मानवनिर्मितच आहे, याचे आपल्याकडे पुरावे सुद्धा आहे आणि ते मी सिद्ध करेन, असा दावाही ली-मेंग यान यांनी केला आहे.
कोरोना व्हायरस हा वुहानच्या मांस बाजारातून आलेला नाही, कारण मांस बाजार हे फक्त नाव पुढे करण्यात आले आहे. हा खतरनाक विषाणू हा वुहानच्या प्रयोगशाळेतून आला आहे. तो मानवनिर्मितच आहे. या विषाणूचा जिनोम हा मानवी फिंगर प्रिंट सारखाच आहे. त्यामुळे हा व्हायरस मानवनिर्मित व्हायरस आहे, असा दावाही त्यांनी केला.
कोरोना व्हायरस किंवा दुसरा कोणत्याही व्हायरसमध्ये मानवी बोटांच्या प्रतिकृती दिसून आली तर हे तेवढे सांगण्यास सोपे असते की ही व्हायरस हा मानवनिर्मित आहे, असंही ली मेंग यांनी सांगितले.
मुंबईत पुढच्या 3-4 आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना, महापालिकेने दिली माहिती
ली मेंग या हॉंगकॉंग सोडून अमेरिकेत स्थिर झाल्या आहे. चिनी सरकारने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत स्थलांतरित झाल्या. चिनी सरकारने ली मेंग यांची संपूर्ण माहिती ही गायब केली आहे.
याआधी, ली मेंग यांना चीन सरकावर आरोप केला होता. कोरोना व्हायरसविषयी जगाला सांगण्या पूर्वीच त्यांना माहित होते. हे देखील सरकारच्या उच्च स्तरावर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. चीनने कोरोनाविषयी माहिती लपवली आहे, असाही आरोप त्यांनी केला होता.