• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • चीनचा डोळा अफगाणिस्तानच्या ‘बगराम एअरबेस’वर, भारताविरोधात होऊ शकतो वापर

चीनचा डोळा अफगाणिस्तानच्या ‘बगराम एअरबेस’वर, भारताविरोधात होऊ शकतो वापर

सामरिकदृष्ट्या (Strategically important) अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ‘बगराम एअरबेस’वर (Bagram air base) सध्या चीनचा (China) डोळा असून त्यावर ताबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 2 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता येणार हे निश्चित झाल्यानंतर चीननं (China) तालिबानशी जवळीक वाढवायला सुरुवात केली आहे. सामरिकदृष्ट्या (Strategically important) अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ‘बगराम एअरबेस’वर (Bagram air base) सध्या चीनचा (China) डोळा असून त्यावर ताबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. तालिबान आणि पाकिस्तान यांचा वापर करून भारतविरोधी कारवाया करण्यासाठी चीन पावलं टाकत असल्याची शक्यता संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी एका मुलाखतीत ही शक्यता व्यक्त  केली आहे. ‘बगराम एअरबेस’चं महत्त्व बगराम एअरबेस हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील महत्त्वाचा हवाई तळ आहे. या हवाई तळावर ज्याचं नियंत्रण असेल, त्याला पाकिस्तान, भारत आणि अफगाणिस्तान या तिन्ही प्रांतांवर नजर ठेवता येणार आहे. आतापर्यंत हा तळ अमेरिकेच्या ताब्यात होता. मात्र अमेरिकेनं अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर ती जागा बळकावण्याची तयारी चीन करत असल्याचं निक्की हेली यांनी म्हटलं आहे. चीन आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाचाही याला संदर्भ असून हा एअरबेस ज्याच्या ताब्यात असेल, त्याची धोरणात्मक ताकद अधिक वाढणार असल्यामुळे चीनने हा एअरबेस ताब्यात घेण्यासाठी पावलं उचलल्याचं हेली यांचं म्हणणं आहे. चीननं जर या एअरबेसवर ताबा मिळवला, तर ती भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. हे वाचा -काबुलचं बंद विमानतळ सुरु करण्याचं काम कतारकडे, उद्यापासून उडणार Domestic Flights अमेरिकेची जागा कोण घेणार? अफगाणिस्तानमध्ये सरकार जरी तालिबानचं येणार असलं, तरी आशियात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीन आणि रशिया यांच्यात स्पर्धा सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अमेरिकेच्या ताब्यात असणारे एअरबेस आपल्या अधिपत्याखाली यावेत, यासाठी हे दोन देश प्रयत्नशील आहेत. भारतानं याबाबत सावध भूमिका घेतली असून अफगाणिस्तानच्या भूमीचा भारताविरोधात वापर होणार नसल्याचं आश्वासन घेतलं आहे. या एअरबेसवर चीनला ताबा मिळवणं शक्य होतं का आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यावर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  Published by:desk news
  First published: