मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

घटस्फोटामुळं बदललं नशीब! एका रात्रीत अशी झाली 24000 कोटींची मालकीण

घटस्फोटामुळं बदललं नशीब! एका रात्रीत अशी झाली 24000 कोटींची मालकीण

एका मिनिटांत 24 हजार कोटींची मालकीण झाली ही महिला. वाचा नेमकं काय घडलं.

एका मिनिटांत 24 हजार कोटींची मालकीण झाली ही महिला. वाचा नेमकं काय घडलं.

एका मिनिटांत 24 हजार कोटींची मालकीण झाली ही महिला. वाचा नेमकं काय घडलं.

  • Published by:  Priyanka Gawde
बीजिंग, 06 जून : घटस्फोट हे सहसा विवाहित जीवनात खूप वेदनादायक असतं. मात्र तरीही जगभरात घटस्फोटाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. आता तर लॉकडाऊनमुळं घरात कैद असलेल्या जोडप्यांमध्ये जास्त खटके उडत आहेत. मात्र चीनमधून घटस्फोटाचे एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळं एका महिलेचं नशीब फळपळलं. एका रात्रीत ही महिला तब्बल 24 हजार कोटींनी मालकीण झाली. खरं तर, शेन्झेन कंगताई बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स या चीनी लस कंपनीचे अध्यक्ष ड्यू वेइमिन (Du Weimin) यांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतर, युआन लिपिंग (Yuan Liping) यांना पोटगी म्हणून 161.3 कोटी रुपयांचे शेअर मिळाले. या शेअर हस्तांतरणानंतर 49 वर्षीय युआन लिपिंग जगातील सर्वात श्रीमंत महिला झाली आहे. या घटस्फोटाविषयी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. वाचा-ठरलं! 'या' महिन्यात कोरोनावर लस मिळणार, 5 कंपन्या ट्रायलसाठी सज्ज महिलेला मिळाले 24 हजार कोटी गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, सोमवारी शेअर बाजार बंद होताना या शेअरची किंमत 3.2 अब्ज म्हणजेच 24 हजार कोटी होती. घटस्फोटित पतीची एकूण मालमत्ता आता सुमारे 3.1 अब्ज डॉलर्स म्हणजेच 23 हजार 250 कोटी झाली आहे. यात तारण ठेवलेल्या शेअर्सच्या किंमतीचा समावेश नाही. वाचा-चालत्या ट्रकनं घेतला पेट तरी ड्रायव्हर थांबला नाही, पुढे गेला आणि... शेतकरी कुटुंबातील आहेत ड्यू 56 वर्षीय ड्यू यांचा जन्म चीनमधील जियांग्शी ( Jiangxi) प्रांतातील शेतकरी कुटुंबात झाला. महाविद्यालयात केमिस्ट्रीचे शिक्षण घेतल्यानंतर 1987मध्ये त्यांनी क्लिनिकमध्ये काम करण्यास सुरवात केली. त्यानंतर 1995मध्ये ते बायोटेक कंपनीचा सेल्स मॅनेजर झाले. यानंतर, कंगताईने 2009मध्ये मिन्हईचीला ताब्यात घेतले आणि ते संपूर्ण कंपनीचे अध्यक्ष झाले. मिन्हईची स्थापना 2004 मध्ये ड्यू यांनी केली होती. वाचा-पुण्यात मध्यरात्री विवाहित जोडप्याच्या बेडरूममध्ये डोकावत होता अल्पवयीन तरूण
First published:

पुढील बातम्या