बाप रे! पुराच्या पाण्यानं शहराला वेढलं, टायरवर महिलेनं दिला गोंडस बाळाला जन्म

बाप रे! पुराच्या पाण्यानं शहराला वेढलं, टायरवर महिलेनं दिला गोंडस बाळाला जन्म

टायरवर जन्मलेल्या मुलाचे नाव शूइशेंग (पाण्यात जन्म) असं ठेवण्यात आलं आहे.

  • Share this:

पेंइचिंग, 04 जुलै : अनेक ठिकाणी कोसळधार पावसानं आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कुठे गाड्यांसह लोक वाहून गेले तर काही ठिकाणी मोठी गैरसोय झाली. कोरोनाचा महासंकटात आलेलं हे संकट आणि अशा सगळ्यांचा सामना करत महिलेनं एका मुलाला पुराच्या पाण्यातच मुलाला जन्म दिला आहे.

रुग्णालयात जाण्याआधीच महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्यानं तिला टायरवर झोपवण्यात आलं. या महिलेच्या भोवताली पुरानं वेढलेलं होतं. अशा परिस्थितीत महिलेनं मुलाला जन्म दिला. आई-गोंडस बाळ दोघंही सुरक्षित आहेत. सध्या त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचा-VIDEO : समुद्र किनाऱ्यावर सुरू होतं Wedding Photoshoot, एक लाट आली आणि...

हे वाचा-VIDEO: माज उतरवला! चिनी सैन्याच्या खतरनाक स्टंटला असं दिलं भारतीयांनी उत्तर

ग्लोबल टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार चीनमध्ये आलेल्या महापुरात एका महिलेनं गोंडस बाळाला जन्म दिला आहे. टायरवर जन्मलेल्या मुलाचे नाव शूइशेंग (पाण्यात जन्म) असं ठेवण्यात आलं आहे. ग्रीसच्या लोकांच्या प्रयत्नांचे कौतुक होत असतानाच बरेच लोक चिनी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. देवराज यांनी लिहिले की, 'मानवतेने परिपूर्ण भारतीय सैन्य अशा प्रसंगी नेहमीच प्रथम येते. दुर्दैवाने, समान गोष्ट पीएलएबद्दल बोलली जाऊ शकत नाही. निर्दय पीएलए फक्त सीमा लढाईसाठी प्रशिक्षित आहे.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: July 4, 2020, 10:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या