चीन म्हणाला, 'कोरोना' वुहानचा नव्हे; मग नेमका कुठून आला व्हायरस?

चीन म्हणाला, 'कोरोना' वुहानचा नव्हे; मग नेमका कुठून आला व्हायरस?

जगभरात कोरोनाव्हायरस (Coronavirus) पसरल्यानंतर चीन (China) आणि अमेरिकामध्ये (America) जुंपली आहे.

  • Share this:

बीजिंग, 20 मार्च : जगभरात कोरोनाव्हायरस (Coronavirus) पसरल्यानंतर चीन (China) आणि अमेरिकामध्ये (America) जुंपली आहे. दोन्ही देश या व्हायरससाठी एकमेकांना जबाबदार धरत आहेत. अमेरिकेने याला वुहान व्हायरस (wuhan virus) म्हटलं आहे. तर चीनने अमेरिकने हा व्हायरस वुहानमध्ये पेरल्याचा आरोप केला आहे.

वुहानमध्ये कोरोनाव्हायरस पसरला याचा अर्थ इथूनच या व्हायरसचा उद्रेक झाला असं नाही, हे चीनने स्पष्ट केलं आहे.

हे वाचा - Coronavirus चीनचा धक्कादायक आरोप! 'अमेरिकेने वुहानमध्ये विषाणू पेरला'

चीनचे रेस्पिरेटरी स्पेशालिस्ट झोंग नानसान यांनी सांगितलं की, 2009 मध्ये मेक्सिकोमध्ये H1N1 फ्लू पसरला होता, मग याला मेक्सिको व्हायरस म्हणायचं का?  शिवाय 2012 साली सौदी अरेबियामध्ये मर्स पसरला होतो त्याला सौदी अरब व्हायरस म्हणायला हवं. मात्र आपण असं नाही म्हणू शकतं. या व्हायरसची निर्मिती आणि तो पसरणं यामागे कुणाचाही हात नाही.

"कोविड-19 ला वुहान व्हायर म्हणू शकत नाही कारण अजून वैज्ञानिकदृष्ट्या त्याला पुष्टी मिळालेली नाही. कदाचित जिथून कोविड-19 ची निर्मिती झाली तिथं हा व्हायरस पसरलाच नसावा, असंही असू शकतं."

हे वाचा - भारतात पाचव्या कोरोनाग्रस्ताचा मृत्यू; एकूण रुग्णांची संख्या 196 वर

जगभरात कोरोनाव्हायरसमुळे 9000 पेक्षा जास्त मृत्यू झालेत. तर 2 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. आता युरोप कोरोनाव्हायरसचा नवा केंद्रबिंदू बनला आहे. इटलीमध्ये मृतांचं प्रमाण चीनपेक्षाही जास्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2020 02:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading