बर्थ डे पार्टी ठरली अखेरची! दुमजली इमारत कोसळून 29 जणांचा मृत्यू, घटनेचा VIDEO आला समोर

बर्थ डे पार्टी ठरली अखेरची! दुमजली इमारत कोसळून 29 जणांचा मृत्यू, घटनेचा VIDEO आला समोर

रेस्टॉरेंटमध्ये बर्थ पार्टी सुरू असतानाच अचानक इमारत कोसळी. ढिगाऱ्याखाली दबून आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

बीजिंग, 30 ऑगस्ट : चीनच्या बीजिंगजवळ एक धक्कादायक प्रकार घडला. रेस्टॉरेंटमध्ये बर्थ पार्टी सुरू असतानाच अचानक इमारत कोसळी. ढिगाऱ्याखाली दबून आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 28 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ही दुमजली इमारत असून अचानक कशी कोसळली याची माहिती कोणालाच नव्हती. सध्या ही इमारत अवैधरित्य तर बांधली नव्हती, याची चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या रेस्टॉरेंटमध्ये एका 80 वर्षीय व्यक्तीचा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त जास्त प्रमाणात लोकं जमली होती. मात्र त्याचवेळी ही घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्यातून 59 लोकांचा बाहेर काढण्यात यश आले. आपतकालिन विभाग, आणखी कोणी अडकले आहेत का याचा शोध घेत आहेत. ही घटना शनिवारी सकाळी 9.30च्या सुमारास घडली.

या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये श्वान दलासह आपतकालिन विभागाचे अधिकारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे रेस्क्यू ऑपरेशन करताना दिसत आहेत.

ही घटना कशी घडली, आणि या इमारतीच्या डागडूजीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची सविस्तर चौकशी केली जाणार आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 30, 2020, 3:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या