चीनमधला जगातला सर्वात लांब पूल खुला

चीनमधला जगातला सर्वात लांब पूल खुला

अभियांत्रिकी क्षेत्रातली नवनवीन आश्चर्य प्रत्यक्षात आणणाऱ्या चीनने आता समद्रावरच्या जगातल्या सर्वात लांब पूल सुरू केलेला आहे. यामुळे चीन मकाव आणि हॉंगकाँगमधलं अंतर आता अर्ध्या तासावर येणाराय.

  • Share this:

चीन,10 मे : अभियांत्रिकी क्षेत्रातली नवनवीन आश्चर्य प्रत्यक्षात आणणाऱ्या चीनने आता समद्रावरच्या जगातल्या सर्वात लांब पूल सुरू केलेला आहे. यामुळे चीन मकाव आणि हॉंगकाँगमधलं अंतर आता अर्ध्या तासावर येणाराय. यापूर्वी हेच अंतर पार करण्यासासाठी तीन तास लागत होते. जवळपास 55 किलोमीटर लांबीचा हा पूल हे जगातलं एक आश्चर्य आहे.

याशिवाय हा पूल सुरक्षित आहे. भूकंप, वादळ आणि माल वाहतूक करणाऱ्या महाकाय बोटींपासूनही हा पूल सुरक्षित राहू शकतो. यासाठी 4 लाख टन स्टील वापरण्यात आलं आहे. सन फ्रान्सिस्कोच्या गोल्डन गेट ब्रीजपेक्षा साडेचार पट अधिक स्टील वापरण्यात आलं.

या पुलावर वेगाची मर्यादा 100 किलोमीटर प्रति तास अशी घालण्यात आली आहे.  हा पूल चीनच्या ग्रेटर बे एरियात आहे. जवळपास 56 हजार 500 चौरस किलोमीटरचा परिसर हा पूल व्यापतो.  11 शहरांमधून हा पूल जातो. याशिवाय हॉंगकॉंग - चीन, मकाव - चीन , हॉंगकाग - मकाव अशा सीमांनाही हा पूल स्पर्श करतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2018 10:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading