मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

चीनचा आणखी एक खोटारडेपणा उघड, सर्व जगाला बसला धक्का

चीनचा आणखी एक खोटारडेपणा उघड, सर्व जगाला बसला धक्का

A doctor holds a plastic bag full of swab specimen collected from journalists during lockdown to control the spread of the new coronavirus in Mumbai, India, Thursday, April 16, 2020. Indian Prime Minister Narendra Modi on Tuesday extended the world's largest coronavirus lockdown to head off the epidemic's peak, with officials racing to make up for lost time. (AP Photo/Rafiq Maqbool)

A doctor holds a plastic bag full of swab specimen collected from journalists during lockdown to control the spread of the new coronavirus in Mumbai, India, Thursday, April 16, 2020. Indian Prime Minister Narendra Modi on Tuesday extended the world's largest coronavirus lockdown to head off the epidemic's peak, with officials racing to make up for lost time. (AP Photo/Rafiq Maqbool)

ही माहिती उघड झाल्यानंतर चीनभोवतीचं संशयाचं जाळ आणखी घट्ट झालं असून सर्व जगभरातून चीनवर दबाव वाढत आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
लंडन 26 एप्रिल: कोरोना प्रकरणात चीन संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सर्व जगातून चीनवर आरोप करण्यात येत आहेत. मात्र त्याचं कुठलंही समाधानकारक उत्तर उद्याप चीनने दिलेलं नाही. चीनने कोरोना व्हायरसची माहिती जगाला उशीरा दिले असा मुख्य आरोप आहे. यावरून चीनची फसवाफसवी अनेकदा उघड झाली आहे. आता चीनचा आणखी एक खोटारडेपणा उघड झाला असून त्यामुळे सगळ्या जगालाच धक्का बसला आहे. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य जीवघेणा आजार आहे हे चीनला जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच कळालं होतं. मात्र त्यांनी जगापासून ही माहिती तर दडवलीच उलट या आजाराच्या औषधाच्या पेटेंटसाठीही कुणाला थागपत्ता लागू न देता अर्ज केला होता. वुहानच्या त्याच लॅबोरेटरीने अशा प्रकारचा अर्ज केला होता अशी माहिती ‘डेली मेल’ने दिली आहे. या व्हायरसच्या औषधांचं पेटेंट घेऊन त्यातून पैसे कमावण्याचा डाव चीन आखत होता. मात्र नंतर सगळीच परिस्थिती बदलली. याच वुहानच्या लॅबमधून हा व्हायरस जगभर पसरला असा आरोप करण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर याला वुहान व्हायरस असंही नाव दिलं होतं. ही माहिती उघड झाल्यानंतर चीनभोवतीचं संशयाचं जाळ आणखी घट्ट झालं असून सर्व जगभरातून चीनवर दबाव वाढत आहे. वुहानमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येत अचानक 50 टक्के वाढ झाल्यापासून त्यांच्या अधिकृत आकडेवारीवर शंका वाढतच गेली आहे. गेल्या आठवड्यात, चीनने मृतांच्या संख्येत वाढ करून रुग्णालयांमध्ये झालेल्या मृतांची नोंद केली नव्हती असे कारण पुढे केले होते. आता हाँगकाँगमधील संशोधकांनी एका अभ्यासानुसार असे म्हटले आहे की चीनमध्ये कोरोना विषाणूच्या पहिल्या लहरीचा संसर्ग 2, लाख 32 हजार 000 पेक्षा जास्त असू शकतो. ही संख्या अधिकृत आकड्यांपेक्षा चार पट जास्त आहे. वाचा- इम्रान खान यांच्या खुर्चीला धोका, पाकिस्तानात सरकार आणि लष्करामध्ये वादाची ठिणगी चीनने 20 फेब्रुवारीपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाची केवळ 55 हजार प्रकरणे समोर आल्याचे सांगितले होते. मात्र हाँगकाँग युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांचे म्हणणे आहे की जर सुरुवातीपासूनच चीनने सध्या वापरात येणाऱ्या उपाययोजना केल्या असत्या तर कोरोनाचा संसर्ग कमी झाला असता. हेही वाचाकोरोनाच्या दहशतीत भारतीयांना दिलासा, इतर देशांच्या तुलनेत व्हायरस घेतोय कमी जीव चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची सध्या 83,000 हून अधिक प्रकरणे आहेत. संपूर्ण जगात कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा 2 लाखांच्या आसपास आहे आणि तेथे 26 लाखाहून अधिक संसर्ग होण्याच्या घटना आहेत. सर्व देशांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे चीनच्या आकडेवारीला मागे टाकत आहेत आणि अजूनही मृतांचा आकडा काही थांबत नाही आहे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या