मानससरोवर यात्रेला निघालेली भारतीय यात्रेकरूंची तुकडी चीननं अडवली

मानससरोवर यात्रेला निघालेली भारतीय यात्रेकरूंची तुकडी चीननं अडवली

कैलाश मानसरोवर यात्रेला निघालेली ४७ यात्रेकरूंची पहिली तुकडी नथुला खिंडीतून चीनने पुढे जाऊ न दिल्याने परत आल्याने यंदाच्या यात्रेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

  • Share this:

27 जून : कैलाश मानसरोवर यात्रेला निघालेली ४७ यात्रेकरूंची पहिली तुकडी नथुला खिंडीतून चीनने पुढे जाऊ न दिल्याने परत आल्याने यंदाच्या यात्रेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पहिल्या तुकडीचे अर्ध्या रस्त्यातून परतलेले यात्रेकरू आपापल्या राज्यांत परत गेले असून बाकीच्या सहा तुकड्या जातील की नाही याविषयी अनिश्चितता आहे.

यंदा या यात्रेसाठी एकूण ३५० यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे. यात्रेकरूंची पहिली तुकडी ठरल्या कार्यक्रमानुसार सिक्किम-चीन सीमेवरील नथुला खिंडीपर्यंत पोचली होती. १९ जून रोजी त्यांना खिंड पार करून चीनच्या ताब्यातील तिबेटमध्ये प्रवेश करायचा होता. परंतु खराब हवामानामुळे त्या दिवशी त्यांना खिंड पार करता आली नाही. बेस कॅम्पवर थांबून २३ जून रोजी यात्रेकरून पुन्हा खिंड ओलांडण्यास गेले तेव्हा चिनी सैनिकांनी परवानगी नाकारली.

First published: June 27, 2017, 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading