Home /News /videsh /

चीनमध्ये BBC World News च्या प्रसारणाला बंदी; नेमकं काय आहे कारण?

चीनमध्ये BBC World News च्या प्रसारणाला बंदी; नेमकं काय आहे कारण?

राष्ट्रीय रेडिओ आणि टेलिव्हिजन व्यवस्थापनाने ही बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : बीबीसी वर्ल्ड न्यूज या टीव्ही वाहिनीच्या प्रसारणाला चीनमध्ये बंदी घालण्यात आल्याची बातमी चीनमधील चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कने (China Global Television Network's (CGTN) दिली आहे. राष्ट्रीय रेडिओ आणि टेलिव्हिजन व्यवस्थापनाने ही बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं या बातमीत म्हटलं आहे. बीबीसी वर्ल्ड न्यूजने चीनसंबंधी बातम्या देताना चीनमधील कायद्यांचं गंभीररित्या उल्लंघन केलं आहे. या बातम्या सत्यता आणि निष्पक्षता मांडणाऱ्या नसून त्यामुळे चीनच्या राष्ट्रीय हिताला व एकजुटीला धोका निर्माण झाला आहे असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या वाहिनीच्या प्रसारणावर आम्ही बंदी आणत असल्याचं प्रशासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

हे देखील वाचा - 'मोदी सरकारनं भारताची जमीन चीनला दिली,' राहुल गांधींचा मोठा आरोप

या प्रकारांमुळे चीनमध्ये वाहिनी प्रसारण करण्यासंबंधीची पात्रता बीबीसी वर्ल्ड न्यूज पूर्ण करत नाही म्हणून आम्ही त्यांना प्रसारणाची परवानगी नाकारत आहोत. तसंच पुढचं वर्षभर त्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही असंही या पत्रकात म्हटलं आहे. चीनमध्ये उपलब्ध असलेल्या बहुतांश टीव्ही चॅनेल पॅकेजेसमध्ये बीबीसी वर्ल्ड न्यूज या इंग्रजी चॅनलचा समावेशच नाहीए. पण काही हॉटेल आणि घरांत मात्र हे चॅनल दिसतं. चीनमध्ये काम करणाऱ्या रॉयटर्सच्या दोन पत्रकारांनी सध्या बीबीसी दिसत नसल्याचं सांगितलं. याबाबत तातडीने प्रतिक्रिया देण्यास बीबीसीने नकार दिला. China Global Television Network's (CGTN) ने युनायटेड किंग्डममध्ये स्टार चायना मीडिया लिमिटेड या खोट्या नावाने प्रसारणाचं लायसन्स घेतलं होतं असं यूके सरकारच्या तपासात सिद्ध झालं. त्यामुळे ब्रिटिश मीडिया रेग्युलेटर ऑफकॉमने 4 फेब्रुवारीला China Global Television Network's (CGTN) चं युकेतील कार्यक्रम प्रसारणाचं लायसन्स रद्द केलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून चीनने ही कारवाई केली असावी.
Published by:news18 desk
First published:

Tags: China, Covid19, India, India china, International, World news

पुढील बातम्या