Home /News /videsh /

OMG! या देशात अख्खं शहरचं Artificial Intelligence वर चालतं, नेमका काय आहे प्रकार जाणून घ्या

OMG! या देशात अख्खं शहरचं Artificial Intelligence वर चालतं, नेमका काय आहे प्रकार जाणून घ्या

शहरांच्या सुविधा व यंत्रणा सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केल्या जात आहेत. यामुळे त्या शहरांतील लोकांचे दैनंदिन जीवन उत्तम बनत आहे.

    बिजिंग, 05 नोव्हेंबर: आधुनिक शहरांमध्ये या शहराचे नाव पहिले घेतले जाते. तिथं आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रोजची कामं सहजपणे केली जाऊ शकतात. आजकाल या संदर्भात एक आणखी शब्द प्रसिद्ध झाला आहे तो म्हणजे स्मार्ट सिटी. शहरांच्या सुविधा व यंत्रणा सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केल्या जात आहेत. यामुळे त्या शहरांतील लोकांचे दैनंदिन जीवन उत्तम बनत आहे. याबाबतीत चीनमधील एक शहर एक पाऊल पुढे आहे. चीनमधील हांग्जो शहर हे संपूर्णपणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर चालत आहे. सर्व काही सॉफ्टवेअर वर आधारित हे शहर आधीपासूनच एक पाऊल पुढे होते परंतु आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमाने हे शहर अधिकच प्रगत झाले आहे.या सर्व गोष्टी ऐकायला एखाद्या कथेप्रमाणे वाटत आहेत पण चीनच्या एका शहराने ते शक्य करून दाखवले आहे. इथल्या सर्व सिस्टीम या येथील लोक किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर आधारित नाही तर त्याऐवजी ही सर्व कामे AI करतं. चार वर्षापूर्वी झाली याची सुरुवात 2016 मध्ये या शहराची लोकसंख्या 90 लाखांपर्यंत होती. त्यावेळी ते आलिबाबा आणि फ्रॉक्सकॉन सिटी ब्रेन नावाच्या प्रकल्पासाठी काम करत होते. यानंतर शहरातील काही भाग हा यांच्या AI च्या नियंत्रणाखाली येऊ लागला. यानंतर या शहरातल्या सगळ्या गोष्टी ह्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर चालायला लागल्या. लवकर विकसित झालेले नेटवर्क अगदी काहीच काळात या पूर्ण शहरात एक न्युरल नेटवर्क विकसित झाले पाणीपुरवठ्यापासून ते परिसरातील गर्दी नियंत्रणात आणण्यातपर्यंत सर्व गोष्टी या सॉफ्टवेअरद्वारे होऊ लागल्या. यशाचे शिखर लवकरच गाठले न्यू सायंटिस्ट अहवालानुसार या प्रकल्पाला उत्तम यश मिळाले आहे. रस्ते अपघात असो किंवा गुन्हेगारी सर्व सॉफ्टवेअर नियंत्रणात आल्यामुळेच अधिकच सोपे व सुलभ झाले आहे. या सॉफ्टवेअरशी फक्त दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी जोडलेल्या नाहीत तर आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याचा इशारा देखिल सॉफ्टवेअर देतो. शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलला हे सॉफ्टवेअर कनेक्ट केलेले आहे. तसेच शहरात होणाऱ्या विविध घटना व हवामानाच्या स्थितीबद्दल देखिल ते सॉफ्टवेअर माहिती देतं. याचा समावेश इतर शहरांमध्ये सुद्धा हा प्रकल्प चांगल्याप्रकारे कार्य करीत आहे त्यामुळे अनेक लोकांना मदत होत आहे म्हणूनच चीनने इतर शहरांमध्येदेखील या प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे. एवढेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा या प्रकल्पाला लोकप्रियता मिळालेली आहे. ही व्यवस्था चीनमध्ये गुप्तपणे मर्यादित आहे याचे कारण म्हणजे लोकांच्या खरेदीपासून ते चळवळीपर्यंत सर्व डेटा यात आहे. त्याच वेळी अलिबाबा चे व्यवस्थापक जियान शेंग हुआ यांनी एका बैठकीत सांगितले की चीनमधील लोकांनी प्रायवसी बाबतीत चिंता करू नये. याबाबतची सर्व जबाबदारी आमची राहील.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: China

    पुढील बातम्या