Home /News /videsh /

अरे हे काय लालभडक दिसतंय वरती? आकाश पाहून स्थानिकांची बसली पाचावर धारण, कोण म्हणालं कोरोना अपशकून

अरे हे काय लालभडक दिसतंय वरती? आकाश पाहून स्थानिकांची बसली पाचावर धारण, कोण म्हणालं कोरोना अपशकून

स्थानिक लोकांनी आश्चर्य व्यक्त (mysterious blood red skies) केलं, शिवाय अनेक लोक असं आकाश पाहून घाबरून गेले होते. कोणी याला कोरोनाचा अपशकुन असल्याचे म्हटले आहे.

    नवी दिल्ली, 10 मे : आपल्यापैकी कोणीच आकाशात कधी लालभडक रंग पाहिला नसेल. मात्र, एका शहरात आकाश भडक लाल रंगाचे दिसल्याने स्थानिक लोकांनी आश्चर्य व्यक्त (mysterious blood red skies) केलं, शिवाय अनेक लोक असं आकाश पाहून घाबरून गेले होते. कोणी याला कोरोनाचा अपशकुन असल्याचे म्हटले आहे. लालभडक झालेल्या आकाशाचे फोटो आता सर्वत्र व्हायरल होत आहेत. चीनमधील झौशान शहरातील लोकांनी आठवड्याच्या शेवटी रहस्यमयरित्या रक्तासारखे लाल आकाश पाहिले. ज्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली. व्हिडिओमध्ये पोर्ट शहरावरील आकाश लाल भडक रंगात आणि धुक्याच्या दाट थरांसह दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बंदर भागांकडे आकाश सर्वात लाल होते. ग्लोबल टाइम्सने अहवाल दिला की, लोकांनी त्यांच्या घरातून, बाल्कनीतून आणि रस्त्यांवरून आकाश गडद लाल रंगाचे (blood red skies) झाल्याचे पाहिले. सिना आणि वेइबो या चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत, त्याला 150 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. अनेक युजरनी या घटनेला चीन सरकारच्या देशातील कोविड-19 हाताळण्याबद्दल वाईट शगुन म्हटले आहे. “मी यापूर्वी असे आकाश कधीही पाहिलेले नाही. मी खरोखरच आश्चर्यचकित झालो आहे की, आकाश असं लाल देखील होऊ शकतं,” ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार एका वापरकर्त्याने अशी प्रतिक्रिया दिली आहे. जसे-जसे या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले तसे शहरातील लोकांमध्ये घबराट पसरली गेली. टेलिव्हिजन आणि मीडिया आउटलेट्सद्वारे स्पष्ट केले की, रक्तासारखं लाल आकाश नैसर्गिक प्रकाशाच्या अपवर्तनाचा परिणाम आहे आणि याला कोणतंही मानवनिर्मित कारण जबाबदार नाही. अहवालानुसार, झौशान हवामानशास्त्र ब्युरोने स्पष्ट केले, "जेव्हा हवामानाची स्थिती चांगली असते, तेव्हा वातावरणातील अधिक पाणी एरोसोल तयार करतात, ज्यामुळे मासेमारीच्या बोटींच्या प्रकाशाचे अपवर्तन होते आणि रंग विखुरतात. यामुळेच स्थानिक लोकांना आकाश गडद लाल रंगाचे तयार झाल्याचे दिसले." हे वाचा - बापरे बाप! शेतात घुसला तब्बल 13 फूट King Cobra; हातानेच पकडला आणि... पॅसिफिक सॉरी हार्वेस्टिंग करणार्‍या मासेमारीच्या बोटीतून निघणाऱ्या लाल दिव्यांच्या अपवर्तनामुळे लाल आकाश दिसले असावे, असे शहरातील स्थानिक माध्यमांनी सांगितले. हे वाचा - महागाईचे चटके..! गेल्या 10 वर्षांत डाळ-तांदूळ-तेलांच्या किंमतीत 'अशी' झाली वाढ लोकांनी या घटनेची तुलना 1770 च्या एका घटनेशी केली. जपानी शास्त्रज्ञांनी 2017 च्या संशोधन लेखात दावा केल्यानुसार मोठ्या सौर क्रियाकलापांमुळे 1770 मध्ये आकाश नऊ दिवस लाल झाले होते, असं वुहानमधील चायना युनिव्हर्सिटी ऑफ जिओसायन्सेसच्या स्पेस फिजिक्स रिसर्च टीमच्या तज्ज्ञांनी सांगितले. तर माध्यमांनी सौर क्रियाकलापांमध्ये कोणतीही विसंगती पाहिली नाही आणि दोन घटना एकमेकांपासून वेगळ्या असल्याचे सांगितले.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: China, Weather

    पुढील बातम्या