भारताविरोधात पाकिस्तानची ताकद वाढवतोय चीन; आता उचललं हे पाऊल

भारताविरोधात पाकिस्तानची ताकद वाढवतोय चीन; आता उचललं हे पाऊल

चीनने यापूर्वी नेपाळला भारताविरोधात करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात यश न मिळाल्याने आता चीनने मोर्चा पाकिस्तानकडे वळवला आहे

  • Share this:

बीजिंग, 24 ऑगस्ट : पाकिस्तान आणि चीन एकत्रितपणे भारताला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत. शत्रूचा शत्रू मित्र अशा नात्याने चीन व पाकिस्तान एकत्र आले आहेत. चीनने यापूर्वी नेपाळला भारतविरोधात भडकवलं होतं, तेथे अपेक्षित प्रतिक्रिया न मिळाल्याने आता चीनने आपला मोर्चा पाकिस्तानकडे वळवला आहे.

चीनने रविवारी पाकिस्तानसाठी एक युद्धनौका लॉन्च केली आहे. चीन (China Sells Pakistan war eqipment) कडून विकले गेलेले आतापर्यंतच्या युद्धनौकांमधील (Warship) ही सर्वात श्रेष्ठ आहे.

दुप्पट होईल पाकिस्तानी नौसेनेची ताकत

चीनकडून पाकिस्तानला पाठविण्यात येणारी ही पहिला युद्धनौका आहे. चीन या जहाजानंतर पाकिस्तानला आणखी तीन युद्धनौका पाठविणार आहे..पाकिस्तानी मीडियानुसार हा टाइप 054A/P एक गाइडेड मिसाइल फ्रीगेट आहे. मिळालेल्या माहितीनुसार चीनने आतापर्यंत कोणत्याही परदेशी सेनेला हे जहाज विकले नव्हते. तर चिनी मीडियाने सांगितले की या लढाऊ जहाजामुळे पाकिस्तानी नौसेनाची क्षमता दुप्पट होईल.

हे वाचा-हुकूमशहा किम-जोंग उन कोमात की मृत्यू? माजी नेत्याच्या दाव्यानंतर खळबळ

पाकिस्तानला चीन पाठवणार चार लढाऊ जहाजं

2021 पर्यंत पाकिस्तानला अशा आणखी तीन युद्धनौका पाठविण्यात येणार आहेत. चीनच्या हडोंग झोंगहुआ शिपयार्डमध्ये एका लॉन्चचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये नौसेनाच्या मोठे अधिकारी सामील झाले होते.  शिपयार्ड देशात सर्वात मोठ्या बिल्डर, चीन स्टेट शिपबिल्डिंग कॉर्पोरेशनची कंपनी आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 24, 2020, 5:01 PM IST

ताज्या बातम्या