चीनने उगवला सूड; अमेरिकन नेत्यांच्या VISA वर आणली बंदी

चीनने उगवला सूड; अमेरिकन नेत्यांच्या VISA वर आणली बंदी

चीनविरोधात विविध देश एकत्र येत असताना आता चीनने अमेरिकेविरोधात सूड उगवला आहे

  • Share this:

बीजिंग, 13 जुलै : अमेरिकेने अनेक चिनी अधिकाऱ्यांविरोधात कथित मानवाधिकार उल्लंघनांविरोधात घातलेल्या निर्बंधानंतर चीनने सोमवारी काही उच्च अमेरिकी अधिकारी व नेत्यांवर व्हिसा निर्बंध लादून प्रत्युत्तर दिलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनईंग यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अमेरिकन अधिकारी आणि नेते यांच्या वर्तणुकीमुळे आणि शिनजियांग मुस्लिम बहुल प्रांतातील काही अधिकाऱ्यांविरुद्ध व्हिसा बंदीमुळे चीन-अमेरिका संबंधांना गंभीर नुकसान झाले आहे. त्याचा निषेध करायला हवा, असे त्या म्हणाल्या. शिनजियांग प्रांतातील तीन अधिकाऱ्यांविरूद्ध घातलेल्या बंदीच्या संदर्भात हुआ यांनी ही टीका केली.

अमेरिकेतील उइगर मुस्लिमांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ही कारवाई केली आहे. अमेरिकेचे सिनेटर्स मार्को रुबिओ आणि टेड क्रूझ तसेच अमेरिकन धार्मिक स्वतंत्रता संबंधित राजदूत सॅम्युएल ब्राउनबॅक आणि कॉंग्रेसचे ख्रिस स्मिथ यांच्यावर चीनने निर्बंध घातले आहेत.

सीईसीसीचे प्रमुख रुबिओ हे चीनचे टीकाकार आहेत. अमेरिकी अधिकाऱ्य़ांवरील निर्बंधांची घोषणा करताना हुआ म्हणाल्या की शिनजियांग संपूर्णपणे चीनची अंतर्गत बाब आहे आणि अमेरिकेला यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही.

हे वाचा-चीनविरोधात मोदी सरकारचे कडक धोरण; LAC नंतर या क्षेत्रातही माघार

त्या म्हणाल्या की, चीन सरकार आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी तसेच दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकी धार्मिक शक्तींविरूद्ध कारवाई करण्यास वचनबद्ध आहे. पुढे त्या म्हणाल्या की, चीन परिस्थितीच्या आधारे पुढील पावले उचलेल. शिनजियांग, तिबेट आणि अलीकडेच हाँगकाँगशी संबंधित नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायद्यावर अमेरिकेच्या निर्बंधाला उत्तर देताना चीनने प्रथमच अमेरिकन राजकारण्यांवर बंदी घातली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 13, 2020, 9:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading