मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा कहर! 7 जणांचा मृ्त्यू, 60 पेक्षा अधिक संक्रमित

चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा कहर! 7 जणांचा मृ्त्यू, 60 पेक्षा अधिक संक्रमित

सर्वात आधी चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला आणि आता चीनमध्ये आणखी एका व्हायरसने डोकं वर काढलं आहे.

सर्वात आधी चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला आणि आता चीनमध्ये आणखी एका व्हायरसने डोकं वर काढलं आहे.

सर्वात आधी चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला आणि आता चीनमध्ये आणखी एका व्हायरसने डोकं वर काढलं आहे.

  • Published by:  Priya Lad
बीजिंग, 05 जुलै : संपूर्ण जग अजूनही कोरोनाव्हायरशी (coronavirus) लढा देत आहे. हे कमी की काय म्हणून कोरोनाच्या या संकटात आणखी काही व्हायरसची भर पडत आहे. कोरोनानंतर ब्युबोनिक प्लेग  आणि आता एसएफटीएस व्हायरस (SFTS Virus) ने कहर केला आहे. चीनमध्ये (china) एसएफटीएस व्हायरसची प्रकरणं दिसून आली आहे. या संसर्गजन्य आजारामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे आणि 60 पेक्षा अधिक जण संक्रमित झाले आहेत. चीनच्या सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार हा आजार माणसांमार्फत माणसांमध्ये पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, त्याबाबत लोकांना सावध करण्यात आलं आहे. पूर्व चीनच्या जियांग्सू प्रांतात वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एसएफटीएस व्हायरसमुळे 37 पेक्षा अधिक लोक संक्रमित झालेत आणि आता अन्हुई प्रांतात 23 जणांना या व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळते आहे, अशी माहिती पीटीआयने सरकारी ग्लोबल टाइम्सच्या वृत्ताचा हवाला देत दिली आहे. हे वाचा - मॉलमध्ये शॉपिंग करताना कोरोनाला कसं दूर ठेवाल? तज्ज्ञांनी दिला सल्ला जियांग्सूची राजधानी नानजियांगमध्ये या व्हायरसमुळे संक्रमित असलेल्या एका महिलेमध्ये सुरुवातीला खोकला आणि तापासारखी लक्षणं दिसून आली. तिच्या शरीरात ल्युकोसाइट आणि प्लेटलेट कमी झाल्याचं डॉक्टरांना समजलं. एक महिन्याच्या उपचारानंतर या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  रिपोर्टनुसार, अन्हुई आणि पूर्व चीनमध्ये झेनियांग प्रांतात कमीत कमी सात लोकांचा व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. हे वाचा - रशियाची कोरोना लस किती सुरक्षित? WHO ने दिली महत्त्वाची माहिती एसएफटीएस हा व्हायरस नवा नाही. चीनमध्ये 2011 साली या व्हायरसची माहिती झाली होती. प्राण्यांच्या शरीरावर चिकटणाऱ्या कीटकांमुळे हा आजार माणसांमध्ये पसरतो आणि माणसांमार्फत माणसांमध्येही त्याचा प्रसार होऊ शकतो.
First published:

Tags: China, Virus

पुढील बातम्या