ड्रॅगनची डरकाळी: युद्धासाठी तयार राहा, चीनच्या अध्यक्षांचे सैन्याला आदेश

ड्रॅगनची डरकाळी: युद्धासाठी तयार राहा, चीनच्या अध्यक्षांचे सैन्याला आदेश

5 मे रोजी लद्दाखमध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली होती. तर काही वर्षांपूर्वी डोकलाममध्ये चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलं होतं.

  • Share this:

बीजिंग 26 मे: कोरोनाविरुद्ध जग लढत असताना चीनने आपले खरे रुप दाखवायला सुरूवात केली आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी देशाच्या अजस्त्र सैन्य बळाला नव्याने ट्रेनिग देण्याचा आदेश दिलाय. त्याचबरोबर युद्धासाठी कायम तयार राहा असेही आदेश दिले आहेत. लद्दाख सीमेवरचा चीनचा आक्रमकपणा आणि अमेरिकेसोबतचा तणाव या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांच्या वक्तव्याकडे पाहिलं जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज उच्च स्तरीय बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला.

चीनच्या माध्यमांचा हवाला देत हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. क्षी जिनपिंग यांनी संसदेत पीपल्‍स लिबरेशन आर्मी (PLA) आणि पीपल्‍स आर्म्‍ड पोलीस फोर्स (PAPF) च्या प्रतिनिधिमंडळासमोर बोलतांना दिली.

नव्या गरजा आणि भविष्यातली संकटं लक्षात घेऊन सैन्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि सैन्याने कायम युद्धासाठी तयार राहिलं पाहिजे असंही ते म्हणाले.

दरम्यान, लद्दाख सीमेवरची तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत उच्च स्तरीय बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, तीन्ही सैन्यदलाचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नंतर परराष्ट्र सचिवांनी स्वतंत्रपणे पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली.

5 मे रोजी लद्दाखमध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली होती. तर काही वर्षांपूर्वी डोकलाममध्ये चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलं होतं. आता पुन्हा एकदा वादाची स्थिती निर्माण झाल्याने भारताची चिंता वाढली आहे.

हेही वाचा - 

उंदरांपासून सावध राहा! कोरोना लॉकडाऊनमध्ये झालेत आक्रमक; माणसांवर करताहेत हल्ला

3 महिन्यांपासून कोविड -19 रुग्णालयाबाहेर मालकाची वाट पाहतोय कुत्रा

मास्क घातलाय? सोशल डिस्टन्सिंग ठेवताय? तुमच्यावर लवकरच तिसऱ्या डोळ्याची नजर

First published: May 26, 2020, 10:58 PM IST
Tags: Xi Jinping

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading