Home /News /videsh /

China Plane Crash: 132 जणांचा मृत्यू झालेल्या विमान अपघाताबाबत धक्कादायक खुलासा, जाणूनबुजून विमान पाडल्याचा दावा

China Plane Crash: 132 जणांचा मृत्यू झालेल्या विमान अपघाताबाबत धक्कादायक खुलासा, जाणूनबुजून विमान पाडल्याचा दावा

132 जणांचा मृत्यू झालेल्या विमान अपघाताबाबत धक्कादायक खुलासा, जाणूनबुजून विमान पाडल्याचा दावा (Photo: Reuters)

132 जणांचा मृत्यू झालेल्या विमान अपघाताबाबत धक्कादायक खुलासा, जाणूनबुजून विमान पाडल्याचा दावा (Photo: Reuters)

China plane crash: या भीषण विमान दुर्घटनेत 123 प्रवासी आणि 9 क्रू सदस्यांसह 132 जणांचा मृत्यू झाला होता. बोइंग 737 विमान गुआंग्शी प्रदेशातल्या वुझोउ शहराजवळच्या ग्रामीण भागात कोसळलं होतं.

    नवी दिल्ली, 18 मे : चीनमध्ये मार्च 2022 मध्ये एक प्रवासी विमान क्रॅश (China plane crash) झालं होतं. या भीषण विमान दुर्घटनेत 123 प्रवासी आणि 9 क्रू सदस्यांसह 132 जणांचा मृत्यू झाला होता. बोइंग 737 विमान गुआंग्शी प्रदेशातल्या वुझोउ शहराजवळच्या ग्रामीण भागात कोसळलं होतं. यानंतर डोंगराळ भागात आग लागली होती. त्यानंतर या विमान दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या विमानाचा अपघात झाला नव्हता, तर ते विमान जाणीवपूर्वक क्रॅश करायला लावलं होतं, अशी धक्कादायक माहिती चौकशीअंती समोर आली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, विमानाच्या अवशेषातून सापडलेल्या ब्लॅक बॉक्सच्या तपासणीत असं दिसून आलं आहे, की विमानाच्या कॉकपिटमध्ये असणाऱ्यांपैकी कोणी तरी जाणूनबुजून जेट क्रॅश केलं आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी या घटनेचा अर्थ लावताना जे अनुमान बांधलं त्यासंबंधी एकाने सांगितलं, की कॉकपीटमधल्या कुणी तरी जशा कमांड्स दिल्या होत्या, त्याचप्रमाणे विमानाच्या यंत्रणेनं काम केलं होतं. हे अनुमान प्राथमिक होतं, यावरही अहवालात भर देण्यात आला आहे. वैमानिकाने हे स्वतः केलं नसून, कोणी तरी त्याला कॉकपीटमध्ये घुसून तसं करण्यास भाग पाडलं, असंही बोललं जात आहे. चिनी अधिकारी अपघाताची चौकशी करत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत कोणत्याही मेकॅनिकल किंवा फ्लाइट कंट्रोलमधल्या (Flight Control) तांत्रिक अडचणीबद्दल सांगितलेलं नाही, असंही त्या वृत्तात म्हटलं आहे. वाचा : आता खोल महासागरातही 120 जण करू शकतील पार्टी, जवळून पाहता येईल सागरी विश्व चायना इस्टर्न एअरलाइन्सचं हे विमान 29,100 फूट उंचीवर उडत होतं. त्यानंतर अचानक दोन मिनिटं 15 सेकंदांत हे विमान 9,075 फूट उंचीपर्यंत खाली आलं होतं. त्यानंतर हे विमान डोंगराळ भागात कोसळलं होतं. या घटनेचे व्हिडीओ (Flight Accident Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या अपघातानंतर विमानाचा CVR मिळण्याची वाट पाहिली जात होती. चीनच्या नागरी प्रवासी वाहतूक प्रशासनाच्या विमान सुरक्षा कार्यालयाचे प्रमुख झू ताओ म्हणाले, ‘सध्या सीव्हीआरचं डेटा स्टोरेज युनिट नष्ट झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विमानात 132 प्रवासी होते आणि त्यापैकी कोणीही वाचलं नाही. सर्वांचा या अपघातात मृत्यू झाला होता.’ आता हे विमान क्रॅश झालं ते अपघात नसून जाणीवपूर्वक पाडल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
    First published:

    Tags: Airplane, China

    पुढील बातम्या