पाकिस्तानी पुरुषांच्या बायका चीनच्या ताब्यात, सुटकेसाठी करावा लागतोय संघर्ष

बायका माहेरी गेल्यानंतर त्यांना चीन सरकारने बंदी कॅम्पमध्ये डांबून ठेवलंय.

News18 Lokmat | Updated On: Dec 17, 2018 10:07 PM IST

पाकिस्तानी पुरुषांच्या बायका चीनच्या ताब्यात, सुटकेसाठी करावा लागतोय संघर्ष

इस्लामाबाद,17 डिसेंबर : चीनच्या सीमेजवळ असलेल्या पाकिस्तानच्या प्रांतमधले अनेक पुरुषांना सध्या वेगळ्या संघर्षाला तोंड द्यावं लागतंय. त्यांच्या बायका चीन सरकारच्या ताब्यात आहेत. त्यांची सुटका करावी अशी मागणी पाकिस्तानी पुरुषांनी केलीय. मात्र चीन त्यांना कुठलीही दाद देत नाही.


चीनच्या शिनजियांग प्रांतात उइगर मुस्लिम समाजाची संख्या मोठी आहे. इथल्या अनेक बायकाचं पाकिस्तानी पुरुषांची लग्न झालं आहे. मात्र या बायका माहेरी गेल्यानंतर त्यांना चीन सरकारने बंदी कॅम्पमध्ये डांबून ठेवलंय.

उइगर मुस्लिम आणि चीन सरकारमध्ये कायम संघर्ष सुरू असतो.


Loading...

इथल्या लोकांना मुस्लिम धर्मापासून दूर करण्यासाठी सकारने खास कॅम्प बनवले आहेत. यात 10 लाख लोकांना डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप होतोय. पाकिस्तानतले चौधरी जावेद अट्टा हे अशाच पीडित पुरुषांपैकी एक. त्यांनी त्यांची बायको अमीना मनाजी हिला तिच्या शिनजियांग प्रांतात माहेरी राहण्यासाठी सोडलं होतं. पण आता अमीनाला त्या बंदी कॅम्पमध्ये डांबून ठेवलंय. गेल्या वर्षभरापासून त्यांची आणि त्यांच्या पत्नीची भेटच झाली नाही.


अट्टांसारखे अनेक पुरुष आज पाकिस्तानमध्ये आपल्या बायका परत मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. उइगर मुस्लिमांना पाकिस्तानातल्या कट्टरपंथी संस्था मदत करत असल्याचा चीनचा आरोप आहे. तर चीनचा दबाव असल्याने पाकिस्तानी सरकार अशा पुरुषांना काहीच मदत करत नाही. त्यामुळं आम्ही करायचं तरी काय असा प्रश्न या पुरुषांना पडला आहे. 

मुंबई कामगार रुग्णालय आगीचा मोठा खुलासा, या चुकीमुळे झाला 6 जणांचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2018 10:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...