S M L

चीनने तिबेटमधून जाणारा नेपाळ रस्ता खुला केला !

चीनने तिबेटमधून नेपाळच्या सीमेपर्यंत जाणारा हायवे वाहतुकीसाठी खुला केला आहे. व्यापार वाहतुकीसोबतच सैन्याच्या वाहतुकीसाठीही या रस्त्याचा चीनकडून वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Chandrakant Funde | Updated On: Sep 18, 2017 11:23 PM IST

चीनने तिबेटमधून जाणारा नेपाळ रस्ता खुला केला !

18 सप्टेंबर : चीनने तिबेटमधून नेपाळच्या सीमेपर्यंत जाणारा हायवे वाहतुकीसाठी खुला केला आहे. व्यापार वाहतुकीसोबतच सैन्याच्या वाहतुकीसाठीही या रस्त्याचा चीनकडून वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीन आणि नेपाळ या दोन देशांना जोडणारा हा हायवे खुला झाल्याने चीनी सैन्याला बिजिंगपासून थेट दक्षिण आशियायी देशांमध्ये पोहोचणं सुकर होणार आहे. तिबेटचं शिगेज विमानतळापासून ते शिगेज शहरापर्यंत जाणारा हा 40 किलोमीटरचा हायवे नेपाळच्या सीमेलाही थेट जोडण्यात आलेला आलेला आहे.

दरम्यान, या हायवेचा वापर सध्यातरी फक्त व्यापारवृद्धीसाठीच केला जाणार असल्याचं चीनकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे आगामी काळात चीनचा माल दक्षिण आशियायी उपखंडात पोहोचवणं आणखी सोईस्कर होणार आहे. डोकलामचा तणाव निवळल्यानंतर हा हायवे खुला करण्यात आल्याने चीन-आणि भारताचे व्यापार संबंध वाढीस लागतील असं बोललं जात असलं तरी चीनसोबतचा पूर्वानुभव लक्षात घेता भारत काहिशी सावधरितीनेच पावलं टाकणार असल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 11:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close