मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

'दहशतवाद हा वाघासारखा, रखवालदारालाच खाऊन टाकतो'; चीनचा सूर बदलला

'दहशतवाद हा वाघासारखा, रखवालदारालाच खाऊन टाकतो'; चीनचा सूर बदलला

तालिबानने (Taliban)  अफगाणिस्तानात (Afghanistan) सत्ता हस्तगत करताच आता दहशतवादाबाबत चीनचा सूरही (China on Terrorism) बदलू लागला आहे.

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानात (Afghanistan) सत्ता हस्तगत करताच आता दहशतवादाबाबत चीनचा सूरही (China on Terrorism) बदलू लागला आहे.

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानात (Afghanistan) सत्ता हस्तगत करताच आता दहशतवादाबाबत चीनचा सूरही (China on Terrorism) बदलू लागला आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 09 ऑक्टोबर : भारत नेहमीच दहशतवादाच्या (India Against Terrorism) विरोधात राहिला आहे आणि संपूर्ण जगाला एकत्र दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सांगत आहे. चीनला भारताचा मुद्दा कधीच समजला नाही, पण तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानात (Afghanistan) सत्ता हस्तगत करताच आता दहशतवादाबाबत चीनचा सूरही (China on Terrorism) बदलू लागला आहे. दहशतवादावर चीनचा बदललेला चेहरा ग्लोबल काउंटरटेररिझम फोरमच्या (Global Counterterrorism Forum) 11 व्या बैठकीत दिसला.

ISI च्या मोठ्या पाच षडयंत्राचा खुलासा, भारतावर हल्ला करण्याची जोरदार तयारी

मंचावर उपस्थित असलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (Wang Yi) यांनी जगाला दहशतवादाबाबत दुटप्पी मानदंड सोडण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, दहशतवाद एकच प्रकार आहे. हा चांगल्या आणि वाईटमध्ये विभागला जाऊ शकत नाही. त्यांनी दहशतवादाची तुलना भयावह प्राणी वाघाशी केली. वांग यी म्हणाले की, दहशतवाद हा वाघासारखा आहे जो रखवालदाराला खाऊन टाकतो..

सध्या वांग यी यांनी पाकिस्तानचे नाव घेतले नाही किंवा अफगाणिस्तानचे नावही आपल्या भाषणात घेतले नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते, ते या दोन देशांकडे बोट दाखवत होते. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद हे संपूर्ण जगासाठी एक गंभीर आव्हान आहे. एवढंच नव्हे तर वांग यी यांनी दहशतवादाविरोधात जगातील सर्व देशांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

Exclusive: भारतानं अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी घुसखोरी उधळली, चिनी सैनिक ताब्यात

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बैठकीत कोणत्या घटकांमुळे दहशतवाद आपली व्याप्ती वाढवत आहे याबद्दल सांगितले. ते म्हणाले की, दहशतवादी संघटना विज्ञानाचा अधिक वापर करत आहेत. ते त्यांचे नेटवर्क मजबूत करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सोशल नेटवर्क, आभासी चलन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारखे तंत्रज्ञान वापरत आहेत. ते असेही म्हणाले, की जगात कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे दहशतवादाविरोधात उचललेल्या पावलांमध्ये खूप कमकुवतपणा आला आहे.

.दहशतवादाबाबतच्या वक्तव्यावरून चीनने अमेरिकेलाही लक्ष्य केलं. परराष्ट्र मंत्री म्हणाले की, अफगाणिस्तानपासून अफगाण युद्ध आणि आजची परिस्थिती हे स्पष्ट करते की केवळ लष्करी माध्यमांच्या आधारे दहशतवाद नाहीसा होऊ शकत नाही.

First published:

Tags: China, India china