Home /News /videsh /

काय म्हणता? चीन करणार चंद्रावर बटाट्याची शेती, संशोधनाला झाली सुरुवात!

काय म्हणता? चीन करणार चंद्रावर बटाट्याची शेती, संशोधनाला झाली सुरुवात!

चीनने आपल्या चांग ई-4 (Chang'e-4 Moon Mission) या यानामध्ये बटाटे आणि कापसाच्या बिया पाठवल्या होत्या. यामध्ये चंद्रावर याची लागवड करून हे उगवते की नाही हा प्रयोग त्यांनी त्यावेळी केला होता.

    बीजिंग 22 डिसेंबर: अंतराळविश्वातही चीनची (China) कामगिरी जगाला धसका भरवणारी आहे. नुकतेच चीनचे चांग’ई-5 हे यान(Chang'e-5 Moon Mission)  चंद्रावरून पृथ्वीवर परत आलं आहे. या मोहिमेत त्याने आपल्याबरोबर चंद्रावरील मातीचे काही सॅम्पल्स आणण्यात यश मिळवलं आहे. यामुळे आता चीन या मातीवर संशोधन(Lunar Soil Samples) करणार असून मानवासाठी ही माती फायदेशीर आहे की नाही याचा शोध घेणार आहे. या मिशनमध्ये(Lunar Mission of China) यश मिळाल्यानंतर आता चीन चंद्रावर शेती(Vegetation on Moon) करणार असल्याचं स्वप्न बघत असल्याचं बोललं जात आहे. सोव्हिएत युनियनच्या 1976 साली चंद्रावर उतरलेल्या ल्युना 24 या यानाबरोबरच अमेरिकेने (America) देखील 1960 मध्ये चंद्रावर यान पाठवलं होतं. त्यानंतर आता चीनचं हे यान चंद्रावर यशस्वीरीत्या जाऊन आल्यानंतर अशी कामगिरी करणारा चीन (Chin) हा तिसरा देश बनला आहे. चीनच्या या मोहिमेत विविध खनिजं आणि मातीचं सॅम्पल्स आणले आहेत. चंद्रावर शेती शक्य आहे ?     मागील वर्षी चीनने आपल्या चांग ई-4 (Chang'e-4 Moon Mission) या यानामध्ये बटाटे आणि कापसाच्या बिया पाठवल्या होत्या. यामध्ये चंद्रावर याची लागवड करून हे उगवते की नाही हा प्रयोग त्यांनी त्यावेळी केला होता. पण केवळ चंद्राच्या मातीवर त्यांना हा प्रयोग यशस्वी करण्यात यश आलं नव्हतं. यासाठी खास रोव्हरचा त्यांनी वापर केला होता. त्यानंतर चंद्रावरील ही माती शेतीसाठी पोषक नसल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. चंद्रावरील मातीमध्ये कोणत्याही प्रकारची पोषक तत्व नसल्याचं समोर आलं आहे. चीनच्या माध्यमांमध्ये काही वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही माती बटाट्याचं पीक घेण्यासाठी आणि शेती करण्यासाठी योग्य नसल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर या मातीतून ऊर्जा निर्मिती शक्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मातीमध्ये हेलियम -3(Heliam3) चं प्रमाण जास्त असल्यानं याच्या मदतीनं थर्मोन्यूक्लिअर एनर्जीची निर्मिती करण्यासाठी होऊ शकत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. अंतराळात शेती शक्य    मागील वर्षी चीनने आपल्या चांग ई-4 या यानामध्ये बटाटे आणि कापसाच्या बिया पाठवल्या होत्या. यामध्ये चंद्रावर याची लागवड करून हे उगते की नाही हा प्रयोग त्यांनी त्यावेळी केला होता. चंद्राचा (Moon) एकच भाग पृथ्वीवरुन दिसतो, आणि याच भागाची माहिती प्राप्त करण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले. चंद्राचा जो भाग दिसत नाही, अशा डार्क साईडवर चीनने आपलं  चांग ई-4 (Chang'e-4) हे यान पाठवलं होतं. परंतु त्यांना यामध्ये अपयश आलं होतं. यापूर्वी अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्थेनं स्पेस सेंटरमध्ये शेतीचा यशस्वी प्रयत्न केला होता. पण चीनने थेट चंद्रावर बटाटे आणि कापसाचे बी नेत इतिहास रचला होता. काय आहे नासाची शेती योजना ?    आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरमध्ये (International Space Station) नासाने यासाठी खास व्यवस्था केली आहे. कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या परिसरात कशा प्रकारे जीवांची निर्मिती होऊ शकते याचा अभ्यास करण्यासाठी या भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. या सिस्टिमला त्यांनी वेजी(Veji) हे नाव दिलं असून यामध्ये एकाचवेळी सहा रोपांची लागवड करता येऊ शकते. यामधे आतापर्यंत तीन प्रकारच्या सॅलडच्या भाज्या, चिनी कोबी, लाल रशियन केळं आणि जीनिया सारख्या फुलांची लागवड करण्यात यश मिळालं आहे. या व्हेजी सिस्टीममध्ये रोपांना पाणी, हवा आणि खाद्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुरुत्वाकर्षण कमी असल्याने प्रकाशाच्या मदतीनं रोपं मोठी होतात. यासाठी प्रकाशाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळं आता चीनच्या संशोधनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे.  चीन या सॅम्पल्सचे तीन भाग करणार असून चीनमधील वैज्ञानिकांना अभ्यासावे करण्यासाठी एक हिस्सा देण्यात येणार आहे. दुसरा हिस्सा हा नॅशनल म्युझियममध्ये ठेवण्यात येणार असून तिसरा हिस्सा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनच्या संशोधन मोहिमेत सहभागी असणाऱ्या मित्रराष्ट्रांना देण्यात येणार आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: China

    पुढील बातम्या