मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

प्रेमात एवढा मोठा धोका, जुळ्या मुलांचे समोर आले वेगवेगळे वडील आणि...

प्रेमात एवढा मोठा धोका, जुळ्या मुलांचे समोर आले वेगवेगळे वडील आणि...

जगावेगळं प्रकरण, असा धोका प्रेमात कधीच कोणाला दिला नसेल, वाचा नेमक काय आहे प्रकरण.

जगावेगळं प्रकरण, असा धोका प्रेमात कधीच कोणाला दिला नसेल, वाचा नेमक काय आहे प्रकरण.

जगावेगळं प्रकरण, असा धोका प्रेमात कधीच कोणाला दिला नसेल, वाचा नेमक काय आहे प्रकरण.

  • Published by:  Priyanka Gawde
बीजिंग, 06 जून : चीनमध्ये (China) एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. इथल्या एका जुळ्या (Twins) बाळांचे दोन बाबा आहेत. जेव्हा एका मुलाचे बाबा वेगळे आणि दुसऱ्याचे वेगळे हे कळल्यानंतर जो काय गोंधळ उडाला, याचा काही नेम नाही. या दोन्ही मुलांच्या डीएनए रिपोर्टमध्ये (DNA Report) असे दिसून आले आहे की त्यांचे वडील वेगळे आहेत. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर या व्यक्तीस कळलं की आपल्या पत्नीचे अफेअर होते. डेली मेलच्या वृत्तानुसार दहा लाखात केवळ एकात असं प्रकरणं येतं जेव्हा जुळ्या मुलांचे बाबा वेगळे असतात. चिनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक मुलाची डीएनए चाचणी प्रक्रियेचा एक भाग आहे. डेंग याजुन नावाच्या या व्यक्तीला आपल्या पत्नीवर कधीच शंका नव्हती. त्यामुळे दोघंही खूप आनंदी होते. मात्र जुळ्य़ा मुलांचे DNA रिपोर्ट आल्यानंतर मात्र त्याला जबर धक्का बसला. डॉक्टरांच्या मते, कधीकधी महिलांच्या शरीरात एकाच महिन्यात दोन एका सिंगल एगऐवजी दोन एग्ज (eggs) तयार होतात. या प्रकरणात दोन वेगवेगळ्या पुरुषांचे स्पर्म (sperm) या महिलेच्या शरीरात होते. त्यामुळे मुलांचे DNA वेगळे आले. वाचा-लग्नाच्या 3 वर्षानंतर विराट-अनुष्का घेणार घटस्फोट? काय होत आहे ट्रेंड बीजिंगच्या झोंगझेंग फॉरेन्सिक आयडेंटिफिकेशन सेंटरच्या मते, जवळपास दहा लाख जुळ्या मुलांचा जन्म झाल्यावर अशी एक घटना समोर येण्याची शक्यता असते. या प्रकरणात, त्या महिलेने अगदी थोड्या वेळाच्या फरकानं दोन्ही पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवले असावेत, ज्यामुळे दोन्ही मुलांचे वडील वेगळे आहेत. डीएनए रिपोर्टमधून हे स्पष्ट झालं आहे की दोन्ही मुलांची आई एकच आहे मात्र वडील वेगळे आहेत. सध्या डेंग याजन यांनी पोलिसात पत्नीविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. वाचा-VIDEO: अरे देवा! लॉकडाऊनमध्ये शेकडो तरुण-तरुणींनी केली NUDE पार्टी यापूर्वीही घडली होती अशी घटना चीनमध्येही याधीही असाच प्रकार घडला आहे. ज्यात जुळ्या मुलांचे वडील एक वेगळी व्यक्ती होती. यावेळी महिलेनं कबुली दिली होती की, तिचे परपुरुषासोबत संबंध होते. 2019 मध्ये चीनमधील झियामेन शहरात असा प्रकार उघडकीस आला होता. अशा परिस्थितीत मुलाच्या कायदेशीर वडिलांचे नाव नोंदविण्यात बरीच अडचण येते, कारण DNA रिपोर्टनुसार मुलांचे वडील दोन असतात. वाचा-कोरोनामुळे 70 वर्षांनंतर झाली ताटातूट, अखेर अशी झाली भेट! हा VIDEO पाहाच
First published:

पुढील बातम्या