5जी नाही तर चीनने लाँच केला जगातील पहिला 6G सॅटेलाइट; वाचा कसा होईल याचा उपयोग

5जी नाही तर चीनने लाँच केला जगातील पहिला 6G सॅटेलाइट; वाचा कसा होईल याचा उपयोग

आताच्या काळात अनेक देशांमध्ये 5G तंत्रज्ञानासाठी सुद्धा ब्रॉडबॅंड नेटवर्क नसतानाही चीनने (China) त्याच्या जागेवर 6G सॅटलाईट लॉन्च केला

  • Share this:

चीन, 28 नोव्हेंबर : आताच्या काळात अनेक देशांमध्ये 5G तंत्रज्ञानासाठी सुद्धा ब्रॉडबॅंड नेटवर्क नसतानाही चीनने (China) त्याच्या जागेवर 6G सॅटलाईट लॉन्च केला आहे. टियान्यान-5 नावाचा उपक्रम या महिन्याच्या सुरुवातीला 12 इतर उपग्रहांसह लॉन्च करण्यात आला होता. असे मानले जाते की चीनच्या हालचालीमुळे जगात क्रांतीवर आणि त्याचबरोबर सुपर गेम मध्ये एक मोठे स्थान मिळू शकेल.

टियान्यान-5 हे चेंगदू गुओक्सिंग एरोस्पेस टेक्नॉलॉजी आणि बीजिंग मिनोस्पेस टेक्नॉलॉजी द्वारे बनवले गेले आहे. त्याचे वजन सुमारे 70 किलो आहे. सध्या प्रायोगिक स्तरावर तयार केलेला हा उपग्रह अंतराळातील टेटराहर्ट लहरींची चाचणी करणार आहे. असे मानले जाते की या उपग्रहाच्या मदतीने चीन आपल्या जंगलांमध्ये लागलेल्या आगी वर नजर ठेऊ शकेल. जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. प्रत्येक वर्षी जगातील देशांमध्ये उन्हाळा किंवा अपघातात दरम्यान आग लागलेली असते. ज्यामुळे बरेच नुकसान होते मध्यपूर्वेतल्या अनेक देशांनी या नुकसानाची भरपाई करण्यासाठी लोकांवर मोठा कर लावण्याचा प्रयत्न केला होता. जंगलांवर नजर ठेवण्याबरोबरच टोळधाडीच्या हल्ल्यापासून पिकांना वाचवण्यासाठी ही हा उपग्रह देखरेख करणार आहे. यामुळे आपण आधीच सावध होऊ शकू आणि आपल्या पिकांचे नुकसान होण्यापासून वाचेल.

हे ही वाचा -भारतीय लष्कराच्या निशाण्यावर चीन; इस्रायल, अमेरिकेची घेणार मदत

जरी हा उपग्रह लॉन्च करण्यात आला आहे परंतु या क्षणी तो केवळ प्रयोगासाठी वापरण्यात येणार आहे. यशस्वी झाल्यावर मगच त्याचा वापर सर्व ठिकाणी केला जाणार आहे. असे सांगण्यात येत आहे. परंतु जर हा उपग्रह वापरात आला तर 5G तंत्रज्ञानापेक्षा अधिक वेगाने कामे होतील. टेराहटर्ज फ्रिक्वेन्सी ही उच्चप्रतीचे विकिरण घेऊन फिरते. जी डेटा प्रवासाची गती प्रतिसेकंद 100 गीगाबाईट्स पेक्षाही अधिक वाढवते. 5G पेक्षा जलद हा उपग्रह असू शकतो. जेव्हा प्रयोग अवकाशात यशस्वी होईल तेव्हा हे तंत्रज्ञान चीनमध्ये वापरण्यास सुरुवात होईल.

2019 मध्ये चीन ने 5जी नेटवर्कसाठी काम सुरू केले होते. चीनच्‍या टेक्नॉलॉजी ब्यूरोज, संस्था, विद्यापीठे, संस्था आणि महामंडळातील 37 दूरसंचार यांचे पॅनल एकत्र केले होते. त्यानंतर पॅनल त्यावर सातत्याने काम करत होते. व याचा परिणाम आता दिसू लागला आहे. जर हे तंत्रज्ञान कार्य करत असेल तर ती चीनसाठी एक खूप मोठी गोष्ट करणार आहे. जंगले व शेतात नजर ठेवल्याने देशाची उत्पादकता अनेक पटीने वाढणार आहे. युरेशियन टाइम्सच्या अहवालात या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

चिनी कम्युनिस्ट पक्षाचे वृत्तपत्र चायना डेली म्हणते की नजीकच्या काळात चीनचा हा 6जी उपग्रह अनेक जागतिक मुद्द्यांवर ती कार्य करणार आहे. जंगलात होणारे अपघात दरवर्षी वाढत असताना केवळ पर्यावरणाचे नव्हे तर मानवाचे यामुळे नुकसान होत आहे. जंगलाचा आगीमुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डायॉक्साईड सोडला जातो. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होते. म्हणूनच हा उपग्रह आता चीनसाठी खूपच महत्वाचा ठरणार आहे. तंत्रज्ञानाबाबतीत पाहायला गेले तर अजूनही कित्येक देश मागेच आहेत जिथे काही देश अजूनही 5जी पर्यंत सुद्धा पोहोचू शकलेले नाहीत. तसेच 5जी नेटवर्कशी संबंधित अनेक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ एप्रिल-मेमध्ये कोरोनामुळे 5जी नेटवर्कची तयारी खराब झाली. कारण त्यांचे म्हणणे असे आहे की या नेटवर्कमुळे हा आजार अधिकच पसरत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 28, 2020, 7:51 PM IST
Tags: china

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading