Home /News /videsh /

चीनकडून अँटी-शिपबॅलेस्टिक मिसाईलची चाचणी, Satellite Image मधून मोठा खुलासा

चीनकडून अँटी-शिपबॅलेस्टिक मिसाईलची चाचणी, Satellite Image मधून मोठा खुलासा

सॅटेलाईट (Satellite) इमेजमधून ही बाब समोर आली आहे. चीन टकलामाकान वाळवंटातील शिनजियांगच्या ग्रामीण भागात ही चाचणी करत आहे.

    बिजिंग, 14 मे: चीन (China) एंटी शिप बॅलेस्टिक मिसाइल्सची (Anti-ship ballistic missiles) चाचणी करत आहे. सॅटेलाईट (Satellite) इमेजमधून ही बाब समोर आली आहे. चीन टकलामाकान वाळवंटातील शिनजियांगच्या ग्रामीण भागात ही चाचणी करत आहे. समोर आलेल्या फोटोंनुसार, वाळवंटाच्या पूर्वेकडील काठावर एक मोठी लक्ष्य श्रेणी दिसली. या ठिकाणी सापडलेल्या पुराव्यांवरून चीन बॅलेस्टिक मिसाइल्सची चाचणी करत असल्याचं सूचित करते. यूएस नेव्हल इन्स्टिट्यूटच्या मते, या हायपरसॉनिक अँटी-शिप बॅलेस्टिक मिसाइल्स (एएसबीएम) युद्धनौकांसाठी महत्त्वपूर्ण धोका निर्माण करतात. यापूर्वीही अशा मिसाइल्सची चाचणी चीननं याआधीही अनेक एंटी शिप बॅलेस्टिक मिसाइल चाचण्या केल्या आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, चीनने दोन प्रकारच्या मिसाइल्सची चाचणी केली आहे ज्यात DF-21D आणि DF-26 जमिनीवर आधारित आहेत. याशिवाय H-6 बॉम्बर आहे आणि आता याची पुष्टी झाली आहे की टाइप-055 रेन्हाईची देखील चाचणी केली गेली आहे. ''आम्ही कोणाच्या रिमोट कंट्रोलनं...'', Navneet Rana पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये विमानवाहू वाहक लक्ष्यांवरील संशोधनातून असं दिसून आलं आहे की, भविष्यातील संभाव्य संघर्षांना तोंड देण्यासाठी चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी या दूरच्या भागात नवीन लक्ष्यांवर लष्करी सराव करत आहे. अशा टार्गेटची माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. स्वतंत्र संरक्षण विश्लेषक डेमियन सिमन्स यांना असं आढळून आले की, असाच आणखी एक नौदल तळ नैऋत्येस सुमारे 190 मैलांवर आहे. हे ठिकाण डिसेंबर 2018 मध्ये तयार करण्यात आलं होतं. मात्र आतापर्यंत ते लक्षात येण्यापासून बचावले होते, जे सॅटेलाइट इमेजेसवरून ओळखले जाते. सॅटेलाइट फोटो काय सांगतात डेमियन सिमन्सने सांगितलं की, गोलांची रूपरेषा अतिशय अचूक आहे. ओरिएंटेशन्स, शेप्स आणि साईज अनेक लक्ष्यांशी संबंधित आहेत. या साइट्समध्ये काहीही गोंधळलेले नाही. अधिक माहिती देताना ते म्हणाले की, जमिनीवर धातूचे पत्रे टाकल्याचे दिसून येत आहे. हे साहित्याचा एक वेगळा प्रकार आहे. ते उष्णता किंवा रडार वेगळ्या प्रकारे परावर्तित करू शकते. हे आपल्याला या प्रयोगांमागील गुंतागुंतीच्या प्रणाली आणि प्रयत्नांबद्दलचे संकेत देखील देऊ शकते.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: China

    पुढील बातम्या