• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • हद्द झाली! जग लढतंय कोरोनाशी आणि चीनमध्ये सुरू आहे 'डॉग मीट फेस्टिव्हल'; जिवंत कुत्र्यांना भाजून खातायत मांस

हद्द झाली! जग लढतंय कोरोनाशी आणि चीनमध्ये सुरू आहे 'डॉग मीट फेस्टिव्हल'; जिवंत कुत्र्यांना भाजून खातायत मांस

जग कोरोनाशी सामना करत असताना चीनमध्ये सगलं सुखनैव सुरू आहे. चीनमध्ये वादग्रस्त (Dog meat festival in China) खाद्य महोत्सवाचं आयोजन केल्याचे दिसत आहे. प्राणीमित्रांचा याला कडाडून विरोध होत आहे. कारण इथे म्हणे काही लोक जिवंत कुत्र्यांना भाजून खातात.

  • Share this:
बीजिंग, 23 जून :  जगभरात कोरोना (Coronavirus origin) संसर्गाला कारणीभूत ठरल्याने अनेक देश चीनवर (dog meat festival in China) नाराज आहेत. अनेक देशांनी चीनवर बहिष्कार (Boycott China) टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वुहान (Wuhan) मार्केटमधून कोरोना विषाणूचा (CoronaVirus) संसर्ग झाला असे चीनने म्हटलं असलं तरी हा विषाणू चीनमधील लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचा दावा अनेक देशांनी केला आहे. खरं काय, हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही. पण जग कोरोनाच्या दहशतीखाली असताना चीन सुशेगात आहे हे नक्की. चीनमधून काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. या छायाचित्रांनुसार, चीनमध्ये वादग्रस्त डॉग मीट फेस्टिव्हलचे (Dog Meat Festival) आयोजन केल्याचे दिसत आहे. कोरोना काळात चीनने या फेस्टिव्हलचे आयोजन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. युलिनमध्ये (Yulin) या फेस्टिव्हलला सुरुवात झाली असून ते पुढील 10 दिवस ते सुरू राहणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये हजारो-लाखो लोक सहभागी होतात. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेस्टिव्हलसाठी कमी लोक येतील असा अंदाज आहे. अमेरिकेच्या उद्योगाने समुद्रात भूकंप! 18000 किलोचा बाँब फोडला; पाहा VIDEO या वादग्रस्त फेस्टिव्हलला अनेक प्राणीहक्क संघटनांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही दरवर्षी चीनमध्ये या फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. या 10 दिवसीय फेस्टिव्हलमध्ये हजारो श्वानांना मारुन त्यांचे मांस सेवन केले जाते.  असं म्हणतात की जिवंत श्वानांना थेट उकडून त्यांचं मांस खाल्लं जातं. या फेस्टिव्हलच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वीपासूनच कुत्र्यांची चोरी, तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जाते. चीनमधील लोक कुत्र्यांची चोरी किंवा तस्करी करतानाचे फोटोज आणि व्हिडीओज यापूर्वी देखील सोशल मिडीयावर दिसून आले आहेत. ही तस्करी या मीट फेस्टिव्हलसाठी केली जाते. हे ही वाचा: अमेरिकेच्या उद्योगाने समुद्रात भूकंप! 18000 किलोचा बाँब फोडला; पाहा VIDEO कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या फेस्टिव्हलचे आयोजन चीन यंदा करणार नाही अशी आशा लोकांना होती. मात्र असे झाले नाही. एकीकडे जग कोरोनाशी लढा देत असताना दुसरीकडे चीनने मात्र या डॉग मीट फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. या फेस्टिव्हलमध्ये जंगली श्वानांना उकळवून जिवंत भाजताना पाहायला मिळते. चीनमधील प्राणी हक्क संघटना (Animal Rights Group) हे फेस्टिव्हल रोखण्यासाठी सरसावल्या आहेत. चीनमधील डॉग मीट फेस्टिव्हलचे यंदा शेवटचे वर्ष असेल अशी आशा त्यांना आहे. या फेस्टिव्हल पूर्वी प्राणीमित्रांनी अनेक गाड्यांमधील कुत्री जप्त करुन त्यांचे प्राण वाचवले आहेत. चीनमध्ये मटण, चिकनसोबतच कुत्रे आणि मांजरीचे मांस आवडीने सेवन केले जाते. डॉग मीट फेस्टिव्हलमध्ये हजारो कुत्री कापली जातात. त्यानंतर त्यांचे मांस शिजवून किंवा भाजून खाल्ले जाते. तीव्र विरोध असून देखील अंदाधुंद पद्धतीने या फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. वटवाघुळं सेवन करुन कोरोनाची सर्वप्रथम सुरुवात चीनने केली होती. त्यामुळे आता कोणकोणत्या जनावरांपासून आणखी कोणते विषाणू चीन जगाला देणार हा प्रश्न विचारला जात आहे.
Published by:Prem Indorkar
First published: