मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

ट्विटरवर कामुक फोटो, पॉर्न लिंक्सचा भरमार! आंदोलन दडपण्यासाठी चीनकडून नवी युक्ती?

ट्विटरवर कामुक फोटो, पॉर्न लिंक्सचा भरमार! आंदोलन दडपण्यासाठी चीनकडून नवी युक्ती?

आंदोलन दडपण्यासाठी चीनकडून नवी युक्ती?

आंदोलन दडपण्यासाठी चीनकडून नवी युक्ती?

ट्विटरवर चीनमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांची माहिती शोधणाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी चीन सरकार एक नवीन युक्ती वापरत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

बीजिंग, 29 नोव्हेंबर : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्याने अनेक भागात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. चीनमधील या झिरो कोविड धोरणाबाबत देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. लोक रस्त्यावर उतरून सध्याच्या चीन सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. यासोबतच ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत चीनमधील ट्विटर आता एस्कॉर्ट सेवांच्या बनावट ट्विटर खात्यांनी भरले आहे. सोशल मीडियावरील निदर्शने दडपण्यासाठी चीन सरकारची ही नवी चाल असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, सोशल मीडिया नेटवर्कवर चिनी भाषेतील शहरांची नावे सर्च करण्यात येता आहेत, जिथे लॉकडाऊनच्या विरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. यामुळे, विश्लेषकांचे मत आहे की सरकार ट्विटरवर या अश्लील पोस्ट त्या शहरांच्या नावाने शेअर करत आहे, जेणेकरुन जे लोक ट्विटरवर चीनमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांची माहिती शोधत आहेत, त्यांचे लक्ष विचलित होईल. 2009 मध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने चीनमध्ये ट्विटर ब्लॉक केलं होतं. मात्र, देशातील लोक अजूनही VPN किंवा वेबसाइट प्रॉक्सी सेवेद्वारे या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकतात.

विश्लेषकांनी व्यक्त केली चिंता

शांघाय आणि बीजिंग या राजधानीसह अनेक प्रमुख चिनी शहरांमध्ये अलीकडच्या काळात निदर्शने झाली. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनुसार, पॉर्न पोस्टिंग बॉट खाती सोशल नेटवर्क्सवरील माहितीचा प्रसार रोखण्याच्या सरकारी प्रयत्नांचा एक भाग आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील चिनी-अमेरिकन संशोधक मेंग्यु डोंग यांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाइलद्वारे स्पॅमची अनेक उदाहरणे पोस्ट केली, इतर वापरकर्त्यांनी या समस्येला तोंड देण्यासाठी ट्विटरवर सोशल नेटवर्कचे सीईओ इलॉन मस्क यांच्याकडे मदत मागितली आहे.

वाचा - चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक! भारताला कितपत धोका? तज्ज्ञ म्हणतात..

ट्विटरवर अश्लील पोस्ट शेअर

रविवारी मोठ्या संख्येने चिनी भाषेतील ट्विटर खाती लाईव्ह झाली आणि ट्विटर अश्लील फोटो, आक्षेपार्ह व्हिडिओ आणि एस्कॉर्ट सेवांच्या लिंक्सने भरून गेले. ज्या अकाऊंटवरून हे सर्व ट्विट करण्यात आले आहे, त्यातील अनेक खाती वर्षापूर्वी तयार करण्यात आली होती किंवा ती निष्क्रिय होती. परंतु, या आठवड्याच्या शेवटी देशभरात निषेध पसरल्यापासून, त्या खात्यांमधून दररोज हजारो पोस्ट शेअर केल्या जात आहेत.

लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न

पोस्टमधी कामुक फोटो आणि व्हिडिओ शहरांच्या नावांसह येत आहेत. जेणेकरुन आंदोलनाची माहिती सर्च करणाऱ्यांच लक्ष विचलित होईल. या विरोधादरम्यान, चीनमधील उरुमकी शहरातील एका अपार्टमेंटमध्ये आग लागून दहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारच्या शून्य कोविड धोरणाविरोधातील आंदोलन आणखी तीव्र झाले.

First published:

Tags: China, Corona