मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

चीन करतोय सैनिकांच्या DNA मध्ये बदल, बनवतोय हिंस्र सुपर सोल्जर

चीन करतोय सैनिकांच्या DNA मध्ये बदल, बनवतोय हिंस्र सुपर सोल्जर

चीनने त्यांच्या जवानांवर (China Army) जैविक प्रयोग (DNA) करून त्याच्या शरीराची संरचना बदलण्याचा घाट घालता आहे. जेणेकरून त्यांचे जवान सुपर सोल्जर (super soldiers in China) होतील

चीनने त्यांच्या जवानांवर (China Army) जैविक प्रयोग (DNA) करून त्याच्या शरीराची संरचना बदलण्याचा घाट घालता आहे. जेणेकरून त्यांचे जवान सुपर सोल्जर (super soldiers in China) होतील

चीनने त्यांच्या जवानांवर (China Army) जैविक प्रयोग (DNA) करून त्याच्या शरीराची संरचना बदलण्याचा घाट घालता आहे. जेणेकरून त्यांचे जवान सुपर सोल्जर (super soldiers in China) होतील

  • Published by:  Shreyas
बीजिंग, 7 डिसेंबर : चीननी जगज्जेता होण्यासाठी माणुसकीला काळीमा फासणारे प्रयोग सुरू केले आहेत. चीनने त्यांच्या जवानांवर जैविक प्रयोग करून त्याच्या शरीराची संरचना बदलण्याचा घाट घालता आहे. जेणेकरून त्यांचे जवान सुपर सोल्जर (super soldiers in China) होतील आणि युद्धात अधिक बळकटपणे शत्रूचा सामना करू शकतील. जीन्समध्ये केलेल्या बदलांमुळे तो जवान क्रूर आणि भावनाहीन होईल, यासाठी चीन प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आतापर्यंत आपण केवळ जनावरं आणि वनस्पतींमध्येच जेनेटिक इंजिनीअरिंगचा वापर केला जात असल्याचं ऐकलं होतं. पण चीननी थेट त्यांच्या देशातल्या माणासांवरच हे प्रयोग सुरू केले आहेत, अशी माहिती अमेरिकी राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख जॉन रेटक्लिफ (John Ratcliffe) यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला दिली आहे. असा अंदाज आहे की जर हा प्रयोग यशस्वी झाला तर चिनी सैनिक जगातील सगळ्या प्रशिक्षित सैनिकांपेक्षा सक्षम असतील. china army कसं आहे हे तंत्रज्ञान? क्लस्टर्ड रेग्युलेटरी इंटरस्पेस्ड शॉर्ट पेलिंड्रोमिक रिपिट्स (CRISPR) या तंत्रज्ञानाचा वापर करून चीन जवानांमध्ये बायोलॉजिकल बदल करत आहे. खरं तर हे बॅक्टेरियांमध्ये असणारं डीएनए स्ट्रक्चर (DNA structure) असून, रोगांपासून बचावासाठी याचा वापर करतात. तसंच संकरित अधिक उत्पन्न देणारं पीक तयार करण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. जीन एडिटिंग (Gene editing technology) करणाऱ्या शास्रज्ञांना ही भीती होतीच की भविष्यात कुठलातरी देश माणसांच्या जीन्सचं एडिटिंग करू शकतो. चीनने त्यांची भीती सत्यात आणली असून अधिक क्रूर जवान तयार करण्यासाठी या तंत्राचा वापर करत आहे. आधीच झाली सुरुवात चिनी शास्रज्ञ He Jiankui यांनी 2018 मध्ये सात जोड्यांवर जैविक प्रयोग केले होते. अद्याप या प्रयोगांचे निष्कर्ष जाहीर केले गेलेले नाहीत, पण असा अंदाज बांधला जात आहे, की डीएनएमध्ये बदल केलेली व्यक्ती पूर्णपणे लष्कराच्या उपयोगाची असेल. तो सतत आक्रमणाचा विचार करेल आणि त्याचं शरीर त्याला साजेसं असेल. china army गुप्त कागदपत्रांतून मिळाली माहिती चीनने अधिकृतपणे अशा प्रयोगांबद्दल कधीच जाहीरपणे माहिती दिलेली नाही, पण त्यांच्या संरक्षण विभागातील एक दस्तावेज चुकून माध्यमांच्या हाती लागला त्यात CRISPR-Cas या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्यात आली आहे. जवानांची ताकद वाढवण्यासाठी चीन 2016 पासून जीन-एडिटिंग वर काम करत आहे हे चीननी या अहवालात मान्य केलं आहे. असाही अंदाज आहे की, चीन कायमच गुपचूप जवानांच्या डीएनएमध्ये बदल करत असतो. हा बदल इतका गुप्तपणे केला जातो की त्या जवानालाही याचा पत्ता नसतो. जवानाच्या शरीराचा केवळ लष्करासाठीच वापर करण्यासाठी त्याच्या जीनमध्ये बदल केले जात आहेत. नेचर बायोटेक्नोलॉजी (Nature Biotechnology) या जर्नलमध्ये यासंबंधी धक्कादायक बातमी प्रसिद्ध झाली आहे. china army जीन्स एडिटिंगच्या माध्यमातून जवानांच्या शरीरांत खूप मोठे बदल केले जाऊ शकतात. जसं हे तंत्रज्ञान वापरून दोन जनावरांचे जीन्स एकत्र करून नवं जनावर तयार करता येऊ शकतं, तसंच जैविक बदल चीन माणसांत करतो आहे. म्हणजे एखाद्या जवानामध्ये जी वैशिष्ट्य असायला हवीत, त्याच पद्धतीचे बदल त्याच्या जीन्समध्ये केले जातात. उदाहरणच द्याचचं झालं तर, त्यांच्यात संवेदनशीलता ही भावनाच नसेल त्यामुळे युद्धात ते प्रचंड क्रूर होतील आणि अत्यंत निर्दयीपणे लोकांची कत्तल करतील. गंभीर आजारही होऊ शकतात जीन एडिटिंगच्या माध्यमातून लवकरच सैनिकांमध्ये आणखीही भयानक बदल झालेले दिसून येतील. जीन एडिटिंग करताना सैन्याला उपयोगी नसलेलं एखादं जीन डिलिट केलं गेलं तर त्या जीनच्या अभावामुळे त्या जवानाला गंभीर आजारही होऊ शकतात. त्याला कॅन्सरही होऊ शकतो. विस्तारवादी चीन फक्त स्वत: ला शक्तिशाली करण्यामागे लागला आहे, त्यामुळे ते जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण करत आहे. चीनचं लष्कर जगातलं सगळ्यांत मोठं असून त्यात 2.2 मिलियन सैनिक आहेत. या वर्षी सगळं जग कोरोनामुळे उद्भवलेल्या उपासमारीचा सामना करत असताना चीननी सैन्यावर 178.16 बिलियन डॉलर खर्च केला गेला आहे.
First published:

पुढील बातम्या