मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

जैविक, अण्वस्त्रविरोधी आणि रासायनिक शस्त्रे.. चीनच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय?

जैविक, अण्वस्त्रविरोधी आणि रासायनिक शस्त्रे.. चीनच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय?

China Military Drills: यापूर्वी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या संरक्षण विभागाने एका अहवालात म्हटले होते की, चीन रासायनिक आणि जैविक अशा दुहेरी वापराच्या तंत्रज्ञानावर संशोधन करत आहे. नुकताना चीनने भारताच्या सीमाभागात असा सराव केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

बीजिंग, 17 डिसेंबर : भारतासोबतच्या तणावादरम्यान चीन ((India-China Tension)) काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. चिनी सैनिक रात्रीच्या अंधारात धोकादायक लष्करी अभ्यास (Warfare Drill) करत आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (Peoples Liberation Army) संयुक्त लष्करी ब्रिगेडने तिबेटमध्ये बायोलॉजिकल (जैविक), अण्वस्त्रविरोधी युद्ध आणि रासायनिक शस्त्रांसह युद्ध सराव केला आहे.

तिबेटला लागून असलेल्या पूर्व लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनमध्ये वाद असून तो आतापर्यंत सुरू आहे. खुद्द पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) ने आपल्या अधिकृत न्यूज पोर्टलवर या युद्ध अभ्यासाची माहिती दिली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या उत्तरार्धात चिनी सैन्याने तिबेट मिलिटरी रीजन (TMR) मध्ये मोठा सराव केला होता. तिबेट मिलिटरी रिजन हे वेस्टर्न थिएटर कमांडमध्ये येते, जे चीनच्या पाच लष्करी कमांडपैकी सर्वात मोठे आहे. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात आयोजित 24 तासांच्या दीर्घ सरावाची बातमी मंगळवारी पीएलए न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे.

प्रकाशित बातमीत अभ्यासाचं स्वरूप आणि त्यात सहभाग घेतलेल्या सैन्याचे वर्णन केले आहे, मात्र, तिबेटमध्ये सराव कोठे आयोजित केला गेला हे सांगितलेलं नाही. त्यात लिहिले होते, 'तिबेट मिलिटरी एरिया कमांड अंतर्गत एक संयुक्त लष्करी ब्रिगेड नोव्हेंबरच्या उत्तरार्धात बर्फाळ पठारावर लढाऊ सराव केला आहे.' याच्या मथळ्यात लिहलंय की, 'तिबेट मिलिटरी रिजनच्या सिंथेटिक ब्रिगेडने क्रॉस-डे आणि नाईट मोबाईल मल्टी-आर्म कोऑर्डिनेटेड रिअल वॉरफेअर एक्सरसाइज केली'.

अमेरिकन कोब्रा अँटी-टँक गायडेड मिसाईलच्या चिंधड्या उडवणारं भारतीय ATGM काय आहे?

गॅस मास्क घातलेले सैनिक

अहवालात सरावाची छायाचित्रे होती, ज्यामध्ये एका सैनिकाने गॅस मास्क घातलेला होता. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या संरक्षण विभागाने एका अहवालात म्हटले होते की, चीन रासायनिक आणि जैविक अशा दुहेरी वापराच्या तंत्रज्ञानावर संशोधन करत आहे. पीआरसी संभाव्य दुहेरी-वापर जैविक प्रयोगात (China Military Drills) गुंतलेली आहे, असे अहवालात म्हटले आहे. तेव्हापासून बायोलॉजिकल अँड टॉक्सिन्स वेपन्स कन्व्हेन्शन (BWC) आणि केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन (CWC) बाबत चिंता वाढली आहे.

जैविक आणि रासायनिक हल्लाचा इशारा

यात सांगितलंय, की  कमांडिंग ऑफिसरने अणु, जैविक आणि रासायनिक हल्ल्याचा इशारा दिला. त्यानंतर आण्विक, जैविक आणि रासायनिक हल्ला झाला. अचानक, एक ऑर्डर आली आणि तिसऱ्या बटालियनचा कमांडर ली कुनफेंग गॅस मास्क घालून विषबाधा झालेल्या भागातून त्वरीत गेला. नंतर कमांड पोस्टला परिस्थिती कळवली. मग त्याने रासायनिक संरक्षण दलाला मदत आणि स्वच्छता करण्याची विनंती केली. सरावा दरम्यान, 'शत्रू' स्थितीचे बारकाईने निरीक्षण करणे, दिवस-रात्र युक्ती आणि मल्टी-वेपन यासारख्या महत्त्वाच्या आणि कठीण विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.

First published:

Tags: China, India china, Indian army