Home /News /videsh /

पुन्हा एकदा चंद्रावर पोहोचलं चीन, चांग ई-5 यान अंतराळात उतरवण्यात यश

पुन्हा एकदा चंद्रावर पोहोचलं चीन, चांग ई-5 यान अंतराळात उतरवण्यात यश

मंगळवारी चीनने आपलं चांग ई-5 (Chang'e-5) हे अंतराळयान यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलं.

    बीजिंग, 2 नोव्हेंबर : चीन(China)ने अंतराळात आणखी एक मोठं यश मिळवलं आहे. मंगळवारी चीनने आपलं चांग ई-5 (Chang'e-5) हे अंतराळयान यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलं. हे अंतराळयान उतरल्यानंतर चीनच्या राष्ट्रीय स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनने या मोहिमेबद्दल माहिती दिली. हे अंतराळयान आधी निश्चित केलेल्या चंद्रावरील (China Moon Mission Chang) ठिकाणाच्या अगदी जवळ उतरवण्यात चीनला यश आलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील जमिनीचे नमूने गोळा करण्याचं काम हे यान करेल, असं चीनने सांगितलं आहे. चांग ई-5 (Chang'e-5) अंतराळ मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावरील नमूने गोळा करण्यासाठी रोबो पाठवला जाणं, ही चीनच्या इतिहासातील पहिली घटना आहे. हा रोबो चंद्रावरच्या माती, दगडांचे नमूने गोळा करून पृथ्वीवर परतणार आहे. चंद्रावरचे खडक आणि धुळीचे नमून गोळा करणार स्पेस ॲडमिनिस्ट्रेशननी सांगितलं की, चांग ई-5 यान मोहिमेत चंद्रावरील आधीपासूनच माणसाला माहीत नसलेल्या पृष्ठभागावरील खडक आणि धुळीचे 4 पाउंड वजानाचे नमूने गोळा करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. चंद्रावर झालेल्या शेवटच्या ज्वालामुखीबद्दलची माहिती या नमून्यांतून मिळू शकेल, असं म्हटलं जातंय. चीनची ही मोहीम यशस्वी झाली तर तो चंद्रावरील खडकांचे नमूने पृथ्वीवर घेऊन येणारा अमेरिका आणि सोव्हिएत रशियानंतरचा तिसरा देश ठरेल. चंद्रावर वसाहती उभारण्याचा चीनचा मानस या यानाला चंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी चीनच्या प्रचंड शक्तिवान लांग मार्च-5 रॉकेटचा वापर करण्यात आला आहे. हे रॉकेट द्रव केरोसीन आणि द्रव ऑक्सिजनवर चालतं. या मोहिमेच्या माध्यमातून चीन चंद्राबद्दलची आपली माहिती वाढवणार असून भविष्यात चंद्रावर वसाहती वसवण्याचा चीनचा मानस आहे. माणसाला कायमच गूढ गोष्टींची उकल करण्याची इच्छा असते. अंतराळ हेही असंच एक मोठं गूढ आहे. अमेरिका, रशिया हे प्रगत देश अंतराळ संशोधनात खूप पुढे आहेत. चीन महासत्ता असून यात उशिरा पण त्यांनी प्रगती केली आहे. चीनने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या