आम्ही PM मोदींना मदत करू, चीनने दिली 'ही' ऑफर!

आम्ही PM मोदींना मदत करू, चीनने दिली 'ही' ऑफर!

चीनमधील सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाईम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार चीनने पंतप्रधान मोदींना मदत करण्याची तयारी दाखवली आहे.

  • Share this:

बीजिंग, 30 जानेवारी: भारत आणि चीनचे संबंध तणावाचे नसले तरी फार चांगले आहेत, असे देखील नाही. साधारण वर्षभरापूर्वी डोकलाम येथे दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले होते. तेव्हा निर्माण झालेला तणाव आता बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाईम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार चीनने पंतप्रधान मोदींना मदत करण्याची तयारी दाखवली आहे.

'ग्लोबल टाईम्स'मधील रिपोर्टनुसार चीनला भारतात रोजगार निर्मितीच्या संधी वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींना मदत करण्याची आहे. चीनच्या मते मोदींनी देशातील परिस्थितीवर योग्य नियंत्रण ठेवावे. देशात रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे मोदींना असंतोषाचा समाना करावा लागत आहे आणि ही गोष्टी चीनसाठी निश्चितपणे चांगली नाही.

भारतात केंद्र सरकार कमकूवत आहे. पण लोकसंख्येमध्ये विविधता आहे. मोदी त्यांची सार्वजनिक जीवनातील प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करतील. यामुळे भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी चांगली होतील, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

PM मोदींनी चीनची गुंतवणूक वाढवली तर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यांची प्रतिमा देखील सुधारण्यास मदत होईल. असे वाटते की सध्या भारत धर्मसंकटात अडकला आहे. जर भारताने चीनी गुंतवणुकीवर मर्यादा आणली तर रोजगार निर्मिती होणार नाही. भारताने चीनी गुंतवणुकदारांना आकर्षिक केले तर रोजगाराच्या संधी नक्की वाढतील, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. भारतात चीनने केलेली गुंतवणूक ही प्रामुख्य़ाने स्मार्टफोन निर्मीती सारख्या क्षेत्रात केली आहे. भारतात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकार रोजगार निर्मिती संदर्भात एका चांगल्या बातमीची वाट पाहत आहे. चीनी गुंतवणूकदारांकडून त्यांनी अशी बातमी मिळू शकते, असे देखील रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

रोजगार निर्मितीवरून होत आहे टीका

देशातील रोजगार निर्मिती करण्यात आलेल्या अपयशावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. चीनने निर्मिती क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे तेथे रोजगाराची कमतरता नाही, असे विधान त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.

SPECIAL REPORT : या फोनमध्ये सिम कार्डसाठी स्लाॅटही नाही!

First published: January 30, 2019, 8:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading