मुंबई, 16 ऑगस्ट : अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती गंभीर बनली आहे. काबूल विमानतळावर हजारो नागरिक अडकले आहेत. बाहेर देशात जाणारं विमान पकडण्यासाठी सध्या तिथं प्रचंड गर्दी झाली आहे. अफगाणिस्तानचे नागरिक मिळेल त्या मार्गानं देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व परिस्थितीवर चीनची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर चीनची पहिली प्रतिक्रिया आली आहे. तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी चीन तयार आहे. AFP या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. काही महिन्यांपूर्वी तालिबानचा सहसंस्थापक अब्दुल गनी बरादरसह (Mullah Abdul Ghani Baradar) काही प्रमुख नेत्यांनी बीजिंगचा दौरा केला होता.
या दौऱ्यात चीन आणि तालिबान यांच्यात करार झाला आहे. या करारामध्ये तालिबान शिनजियांग प्रांतामधील इस्लामी दहशतवादी संघटनांना मदत देणे बंद करेल त्याच्या बदल्यात चीन या दहशतवादी संघटनेला मान्यता देईल, असे ठरले होते. त्यानुसार आता तालिबाननं राजधानी काबूलसह बहुतेक भाग ताब्यात घेतल्यानंतर चीनची ही प्रतिक्रिया आली आहे.
#BREAKING China says willing to develop 'friendly relations' with Afghanistan's Taliban pic.twitter.com/Xe68h9K9nn
— AFP News Agency (@AFP) August 16, 2021
अशांत अफगाणिस्तानात अडकलं राशिद खानचं कुटुंब, बाहेर पडण्याचा मार्ग बंद
अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून माघार घेण्याची घोषणा सुरु केल्यानंतर तालिबाननं पुन्हा डोकं वर काढले आहे. तालिबाननं मे महिन्यापासून अफगाणिस्तान ताब्यात घेण्यासाठी युद्ध सुरु केलं आहे. त्यांनी रविवारी काबूलवर कब्जा केला. काबूल ताब्यात घेताच तालिबाननं युद्ध समाप्त करण्याची आणि संपूर्ण अफगाणिस्तानात शरिया लागू करण्याची घोषणा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, China, Taliban