S M L

'हे' क्षेपाणास्त्र चीनच्या ताब्यात, जगात कुठेही करू शकतो हल्ला

या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगाच्या दसपट (१० मॅच) असल्याने ते सोडल्यापासून जेमतेम एका तासात जगातील कोणत्याही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकेल.

Sachin Salve | Updated On: Nov 21, 2017 06:31 PM IST

'हे' क्षेपाणास्त्र चीनच्या ताब्यात, जगात कुठेही करू शकतो हल्ला

21 नोव्हेंबर :  जगात कुठेही असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकणारे 'डाँगफेंग-४१' (डीएफ-४१) हे अतिप्रगत आंतरखंडीय बॅलेस्टिक आण्विक क्षेपणास्त्र पुढील वर्षाच्या सुरुवातीस चिनी लष्कराच्या सक्रिय सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

चीनने हे क्षेपणास्त्र विकसित करण्यास सन २०१२ मध्ये सुरुवात केल्यापासून या महिन्याच्या सुरुवातीस देशाच्या पश्चिमेकडील वाळवंटी प्रदेशात त्याची आठवी चाचणी घेण्यात आली, असं 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट' दैनिकाने म्हटलं आहे.

चीनच्या मुख्य भूमीवरून सोडलेल्या 'डीएफ-४१'च्या टप्प्यात जगातील कुठलेही लक्ष्य येऊ शकत असल्याने आक्रमक अस्त्राखेरीज इतरांवर वचक ठेवण्यासाठीही चीनला या क्षेपणास्त्राचा सामरिक उपयोग होईल, असे तज्ज्ञांना वाटतं. या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगाच्या दसपट (१० मॅच) असल्याने ते सोडल्यापासून जेमतेम एका तासात जगातील कोणत्याही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकेल.डीएफ-४१ची वैशिष्ट्यं

कमाल पल्ला- १२ हजार किमी

कमाल वेग- १० मॅचहून अधिक

Loading...

अण्वस्त्रे- एकावेळी १० पर्यंत

प्रत्येक अण्वस्त्राने स्वतंत्र लक्ष्यभेद शक्य

घन इंधनटाक्यांचे तीन टप्पे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 06:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close