म्यानमार सीमेवर चीन उभारतोय दोन हजार किमीची भिंत

म्यानमार सीमेवर चीन उभारतोय दोन हजार किमीची भिंत

म्यानमारच्या (Mynmar) सीमेलगत चीन (China) 2000 किलोमीटर लांबीची भिंत बांधत असल्याचे समोर आलं आहे. म्यानमारमधून होणारी अवैध घुसखोरी रोखण्यासाठी चीन ही भिंत बांधत असल्याचं सांगितलं जात आहे.

  • Share this:

म्यानमार : म्यानमारच्या (Mynmar) सीमेलगत चीन (China) 2000 किलोमीटर लांबीची भिंत बांधत असल्याचे समोर आलं आहे. म्यानमारमधून होणारी अवैध घुसखोरी रोखण्यासाठी चीन ही भिंत बांधत असल्याचं सांगितलं जात आहे. दक्षिण आशियात (South Asia) दादागिरी करुन चीन आपली हुकूमशाही गाजवताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून चीनने म्यानमारच्या (Mynmar) सीमेलगत काटेरी तारांचा वापर करुन 2000 किलोमीटर लांबीची भिंत उभारणीचे काम सुरु केले आहे. म्यानमारच्या सैन्याने या प्रकाराला विरोध केला आहे.

चीनचा दक्षिण आशियात वाढत असलेला हस्तक्षेप हा राजकारण, अर्थशास्त्र आणि संरक्षणावर मोठा परिणाम करीत असल्याचे अमेरिकेच्या (America) अभ्यासगटाने म्हटले आहे. येत्या दशकात असे प्रकार वाढल्यास संघर्ष अटळ असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

रेडिओ फ्रीच्या वृत्तानुसार म्यानमार लगतच्या सीमाक्षेत्रात चीन सुमारे 2000 किलोमीटर लांबीची भिंत उभारत आहे. म्यानमारमधून होणारी अवैध घुसखोरी रोखण्यासाठी ही भिंत उभारली जात असावी, असा दावा ग्लोबल टाईम्सने केला आहे. चीनच्या दक्षिण-पश्चिम भागातील युन्नान प्रांतात काटेरी तारांचा वापर करुन 6 ते 9 मीटर उंचीची ही भिंत उभारण्याचे काम सुरु आहे. वेस्ट मिडीयाच्या वृत्तानुसार देशातील असंतुष्ट वर्ग बाहेर पळून जाऊ नये, यासाठी चीन ही भिंत उभारत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

म्यानमारने केला विरोध

या भिंत उभारणीस म्यानमार सैन्याने जोरदार विरोध केलाय. म्यानमार (Mynmar) लष्कराने चीनी अधिकाऱ्यांना पत्र लिहीत अशा काटेरी तारा लावण्याबाबत विरोध दर्शवला आहे. म्यानमारमधील इरावडी या वृत्तपत्रानुसार, म्यानमारच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल जा मिन तुन यांनी म्हटलं आहे, की चीनने BP-125 या पोस्टलगत रविवारी कुंपण घालण्याचे काम सुरु केले आहे. स्थानिक बटालियनने चीनला (China) आक्षेप घेणारं पत्र पाठवलं आहे.

1961 साली केलेल्या करारानुसार आम्ही हे आक्षेप पत्र पाठवत असल्याचे या बटालियनने म्हटलंय. या कराराच्या तरतुदींनुसार सीमारेषेच्या 10 मीटरच्या आत कोणतेही बांधकाम केले जाऊ शकत नाही. मात्र अवैध घुसखोरी रोखण्यासाठी हे कुंपण घातले जात असल्याचा दावा चीनने केला आहे.

रेडिओ फ्री अशियाच्या वृत्तानुसार दक्षिणी महान भिंत या कोडने ही संपूर्ण योजना राबवली जात आहे. या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून 650 किलोमीटर परिसरात हे कुंपण घालण्यात आले आहे. 2022 पर्यंत म्यानमारच्या सीमेलगत 2000 किलोमीटरवर हायटेक भिंत बांधण्याचे काम पूर्ण करण्याचे चीनचे उदिष्ठ आहे. या कुंपणातून वीजेचा प्रवाह सोडला जाऊ शकतो तसेच यावर इन्फ्रारेड सेंसरचे कॅमेरेदेखील लावले आहेत.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या सर्वप्रकारामागे चीनची मोठी योजना आहे. या कुंपणामुळे चीनमधील विरोधक सहजासहजी म्यानमार किंवा व्हिएतमानमध्ये जाऊ शकणार नाहीत. तसेच आपले विरोधक देश सोडून अन्य देशात जाऊन लपू नयेत, असे चीनला वाटते.

यूएस इन्स्टिट्युट ऑफ पीस या अमेरिकी अभ्यास गटाने बुधवारी प्रकाशित केलेल्या एका अहवालात म्हटले आहे, की चीनच्या सहभागामुळे या भागावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे, एक यशस्वी धोरण ठरवणे आणि अमेरिकेचे हित आणि मूल्य वाढवणे महत्वाचे आहे. हा अहवाल दोन सदस्यीय पथकाने तयार केला असून या पथकात वरिष्ठ तज्ज्ञ, माजी धोरण तज्ज्ञ, आणि निवृत्त राजदूत यांचा समावेश आहे.

चायनीज इन्फ्लुएन्स ऑन कॉन्फ्लिक्ट डायनॅमिक्स इन साऊथ एशिया स्टेटस या अहवालानुसार या क्षेत्रात चीनच्या (China) वाढत्या हस्तक्षेपामुळे परिस्थितीत बदल होऊ लागला आहे. हा एक असा प्रदेश म्हणून उदयास येत आहे जिथे अमेरिका-चीन आणि प्रादेशिक शत्रुत्व हे हिमालयाच्या उंचीपासून ते हिंदी महासागरच्या खोलीपर्यंत विस्तारले आहे.

दक्षिण अशिया हे अमेरिका आणि चीन या दोन्ही राष्ट्रांसाठी महत्वाचे क्षेत्र आहे. अमेरिकी विचारगटाच्या म्हणण्यानुसार, भारत–पाकिस्तान वादात चीनने तटस्थ भूमिका घेण्याऐवजी तो पाकिस्तानला मदत करीत आहे. असे केल्यास आशियातील भारताचे वर्चस्व कमी होण्यास मदत होते. खासकरुन मागील वर्षी काश्मीर प्रश्नी चीनने पाकिस्तानला अधिक सर्मथन देऊ केले. चीन-भारताचा सीमावर्ती भाग हा अजूनही चर्चेचा विषय आहे. चीन-भारताचे संबंध हे यापुढील काळात प्रतिस्पर्धेचे असतील आणि आशियातील दोन शक्तीशाली देश हे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सहयोगासाठी संघर्ष करतील.

First published: December 18, 2020, 6:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या