Home /News /videsh /

चीनची पावलं काही थांबेना, ड्रॅगनने नेपाळच्या जमिनीवर बांधल्या 9 इमारती

चीनची पावलं काही थांबेना, ड्रॅगनने नेपाळच्या जमिनीवर बांधल्या 9 इमारती

नेपाळमध्येही आपला विस्तार वाढवण्याचं काम चीननं बिनधास्त सुरू केलं आहे. नेपाळच्या हुम्ला जिल्ह्यातली ही घटना आहे.

    नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : चीनचं विस्तारवादी धोरण आता नेपाळच्या दिशेन सुरू आहे. नेपाळच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा आणि थंड वातावरणाचा फायदा घेत नेपाळच्या भूमीवर चीन हळूहळू कब्जा करत असल्याचं समोर आलं आहे. नेपाळमध्येही आपला विस्तार वाढवण्याचं काम चीननं बिनधास्त सुरू केलं आहे. नेपाळच्या हुम्ला जिल्ह्यातली ही घटना आहे. या जिल्ह्यातील नाम्खा गावात चीनने गुप्तपणे इमारत बांधली असल्याचं सांगण्यात येत आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे 1-2 नाही तर तब्बल 9 मोठ्या इमारती बांधल्या गेल्या आहे. बरं चीनचा मुजोरीपणा इतकाच मर्यादित नाही तर ज्या ठिकाणी त्यांनी या इमारती बांधल्या आहेत त्याच ठिकाणच्या नागरिकांना प्रवेश करण्यात बंदी घातली आहे. मोठी बातमी! सुशांतच्या मृत्यचा खुलासा लांबणीवर, CBI आणि AIIMS ची बैठक रद्द या घटनेचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा त्या गाव पालिका अध्यक्ष विष्णु बहादुर लामा सीमावर्ती क्षेत्रात फिरण्यासाठी गेले होते. त्यांनी सांगितलं की लिमी गावाच्या लाप्चा क्षेत्रात चीनी सैन्याने एकत्र तब्बल 9 इमारती बांधल्या आहेत आणि या बांधून पूर्णही झाल्या आहेत. 'शिवसेना आंदोलन करूनच मोठी झाली मग आम्ही पण आंदोलन करणार' कसा झाला खुलासा ग्रामीण नगरपालिकेच्या सीमा भागात ही इमारती कशी आणि कोणी बांधली? याबाबत माहिती मिळवण्यासाठी जेव्हा गाव परिषदेचे अध्यक्ष विष्णू बहादुर लामा गेले तेव्हा त्यांना त्या बाजुला येण्यासाठी रोखण्यात आलं. लामा यांनी फोनवरून दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वारंवार चौकशीनंतरही तिथे चिनी सैन्य दलाचे जवान आपलं सामान घेऊन दाखल झाले. Weather Alert: पुढच्या 24 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता लामा यांनी सांगितलं की, दोन्ही देशांची जी सीमा आहे त्याच्या एक किलोमीटर नेपाळच्या बाजून इमारतींना बांधण्यात आलं आहे. ते म्हणाले की, सीमेच्या सुरक्षेसाठी असलेले चीन सैन्य अधिकाऱ्यांशीही त्यांनी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांकडून कोणतंही उत्तर आलं नाही. आणि त्यांना परिसरातून जाण्यास सांगितलं.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या