मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Coronavirus चीनचा धक्कादायक आरोप! 'अमेरिकेने वुहानमध्ये विषाणू पेरला'

Coronavirus चीनचा धक्कादायक आरोप! 'अमेरिकेने वुहानमध्ये विषाणू पेरला'

Coronavirus खरंच नैसर्गिक आपत्ती की घातपात? अमेरिकेच्या टीमने वर्ल्ड मिल्ट्री गेम्सदरम्यान विषाणू पेरल्याचा चीनने पहिल्यांदाच जाहीर आरोप केला आहे. चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने काय सांगितलं वाचा...

Coronavirus खरंच नैसर्गिक आपत्ती की घातपात? अमेरिकेच्या टीमने वर्ल्ड मिल्ट्री गेम्सदरम्यान विषाणू पेरल्याचा चीनने पहिल्यांदाच जाहीर आरोप केला आहे. चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने काय सांगितलं वाचा...

Coronavirus खरंच नैसर्गिक आपत्ती की घातपात? अमेरिकेच्या टीमने वर्ल्ड मिल्ट्री गेम्सदरम्यान विषाणू पेरल्याचा चीनने पहिल्यांदाच जाहीर आरोप केला आहे. चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने काय सांगितलं वाचा...

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

नवी दिल्ली,17 मार्च : जगभरात पसरलेला Coronavirus हा खरोखर नैसर्गिक आपत्तीसारखा उद्भवलेला आजार आहे की कुणी जाणीवपूर्वक रचलेला युद्धनीतीचा डाव आहे, असे प्रश्न याआधीही विचारले गेले होते. पण चीनने प्रथमच याविषयी जाहीर वाच्यता करत थेट अमेरिकडे बोट दाखवून संशय व्यक्त केला आहे.

गेल्या ऑक्टोबमध्ये चीनच्या वुहान शहरात जागतिक सैन्य क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती, त्यावेळी अमेरिकन सैन्याच्या टीमने या व्हायरसला शहरात मुद्दाम प्लांट केलं, असा थेट आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केला आहे. या मुद्दाम पसरवलेल्या मानवनिर्मित व्हायरसमुळे वुहान शहर coronavirus च्या भक्ष्यस्थानी पडलं आणि शेकडोंच्या संख्येने या शहरात मृत्यू झाले. या शहरातूनच Covid-19 ची साथ जगभर पसरली.

कोरोना व्हायरसने आता जगभरात हातपाय पसरले आहेत. 17 मार्चपर्यंत 162 देशांमध्ये कोरोनाव्हायरस पोहोचला होता. या व्हायरसमुळे 7100 हून जास्त लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.  1 लाख 80 हजार जणांना याची लागण झाली आहे. त्यात अर्थातच अमेरिकाही आहे.

वाचा - कसं शक्य आहे? चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार, शेजारील देशात मात्र एकही रुग्ण नाही

अमेरिकेतही कोरोनाव्हायरसमुळे आतपार्यंत 85 जणांचा मृत्यू झाला आहे. 4,638 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे.

वाचा - पुणेकरांनो सावधान! तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर बनावट तर नाही ना?, लाखोंचा माल

चीनच्या माध्यमांनी आणि सोशल मीडियाने हा व्हायरस मुद्दाम निर्माण केला गेला असावा आणि अमेरिकेचा हा चीनविरोधातला डाव असावा, असा दावा यापूर्वीही केला होता. खुद्द अमेरिकेच्या आणि रशियातल्या माध्यमांमधूनही ही चर्चा सुरू झालेली आहे. पण 15 मार्चला प्रथमच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अधिकृतपणे यामागे अमेरिका असल्याचा थेट आरोप केला. चीन, रशिया आणि इराणने ही अमेरिकेची जाणून बुजून रचलेली चाल आहे, असा आरोप केला आहे.  कोरोनाव्हायरसच्या माध्यमातून चीनची अर्थव्यवस्था खड्ड्यात घालण्याचा यामागचा डाव असल्याचं या देशांचं म्हणणं आहे.

CNN ने प्रसिद्ध केलेल्या बातमीतच याचा उल्लेख केला आहे. '15 मार्चला प्रथमच चिनी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते लिजियान झाओ यांनी ट्वीट करून अमेरिकन सैन्याची ही चाल असल्याचा आरोप केला आहे', असं वृत्त CNN ने दिलं आहे. "अमेरिकन सैन्याने Coronavirus मुद्दाम चीनमध्ये सोडला", असं या Tweet मध्ये लिजियान यांनी लिहिलं आहे. लिजियन झाओ हे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातल्या माहिती विभागाचे उपव्यवस्थापक आहेत आणि प्रवक्तेही आहेत.

वाचा - महाभयंकर विषाणूबाबत बिल गेट्स यांनी 5 वर्षांपूर्वीच केली भविष्यवाणी, पाहा VIDEO

कोरोनाव्हायरसने चीनमध्ये हाहाकार उडवल्यानंतर काही दिवसातच हा डाव असल्याची गोष्ट छुप्या आवाजात चर्चिली जात होती. पण चिनी प्रवक्त्याच्या ट्वीटमुळे हे प्रथमच अधिकृतपणे व्यक्त झालं आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये World Millitry Games झाले होते. या जागतिक सैन्यदलांच्या क्रीडास्पर्धेत अमेरिकन सैन्याची टीमसुद्धा सहभागी झाली होती. या स्पर्धा वुहान शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या. अमेरिकन सैन्यदलाची टीम जिथे उतरली होती, तिथून वुहानचं बहुचर्चित सी-फूड मार्केट म्हणजेच मच्छीबाजाप जवळच आहे. इथूनच हा व्हायरस शहरात पसरल्याचं सांगितलं जातं.

या जागतिक क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर लगेचच वुहानमध्ये या रहस्यमय आजाराची साथ सुरू झाली. सुरुवातीला ही साथ असल्याचं लक्षात आलं नाही, कारण लक्षणं सर्वसामान्य आणि सौम्य होती. पण एकापाठोपाठ एक मृत्यू होऊ लागल्यानंतर या साथीचं रौद्र रूप समोर आलं आणि चीनच नाही, तर अवघं जग हादरलं.

चीनमध्ये अमेरिकेने खेळण्यासाठी पाठवलेल्या अॅथलिट्सच्या टीमनेच हा विषाणू वुहानच्या बाजारात पेरला, असा चीनचा संशय आहे.

अन्य बातम्या

नावात काय आहे? पण 'कोरोना' नाव असण्याचा झाला या दुकानाला फायदा

ISIS मध्ये असलेल्या केरळच्या तरुणीने जारी केला व्हिडीओ, म्हणाली भारतात यायचंय!

घाबरू नका, काळजी घ्या; भारत अद्यापही कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या टप्प्यात

First published:

Tags: China, Coronavirus, USA