नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : जागतिक महासत्ता अशी ओळख असलेल्या अमेरिकेची काहीश पिछेहाट होताना दिसत आहे. कारण चीनने अमेरिकेला मागे टाकत सर्वात श्रीमंत (China become world richest country) देश होण्याचा मान पटकावला आहे. चीनने गेल्या काही वर्षात केलेली आर्थिक प्रगती अंचबित करणारी आहे. कारण मागील 20 वर्षात एकट्या चीनने आपली एकूण संपत्ती 7 ट्रिलियन डॉलर वरून 120 ट्रिलियन डॉलरवर आणली आहे.
अमेरिकेला (America Wealth) मागे टाकत चीन आता जगातील सर्वात श्रीमंत देश बनला आहे. कन्सल्टन्सी फर्म McKinsey & Co. जगातील 60 टक्के उत्पन्न असलेल्या टॉप 10 देशांच्या बॅलेन्स शीटची तपासणी करून तयार करण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
अहवालानुसार, गेल्या दोन दशकांत संपूर्ण जगाची संपत्ती तिपटीने वाढली आहे. या काळात अमेरिकेला मागे टाकत चीनने सर्वाधिक वेगाने आर्थिक प्रगती केली आहे. मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटचे पार्टनर जॅन मिश्की म्हणाले की, आपण आता पूर्वीपेक्षा अधिक श्रीमंत आहोत. 2000 मध्ये जगाची एकूण संपत्ती 156 ट्रिलियन डॉलर होती, जी आता 2020 मध्ये 514 ट्रिलियन डॉलर झाली आहे. यातील एक तृतीयांश वाढ एकट्या चीनमध्ये झाली आहे.
चीन 2000 मध्ये जागतिक व्यापार संघटनेचा (World Trade Organization) सदस्य झाला आणि त्यावेळी त्याची संपत्ती फक्त 7 ट्रिलियन डॉलर होती, जी आता गेल्या 20 वर्षात 120 डॉलर ट्रिलियन झाली आहे. अशाप्रकारे चीनच्या संपत्तीत गेल्या 20 वर्षांत 113 ट्रिलियन डॉलरची वाढ झाली आहे.
दरम्यान मालमत्तेच्या किमती घसरल्यामुळे, अमेरिकेच्या संपत्तीत मंद वाढ झाली आणि अमेरिकेची एकूण मालमत्ता 90 ट्रिलियन डॉलर झाली. अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. अहवालानुसार, या दोन देशांच्या संपत्तीपैकी दोन तृतीयांश पेक्षा जास्त संपत्ती 10 टक्के श्रीमंतांकडे आहे आणि त्यांचा वाटा सतत वाढत आहे.
वायू प्रदूषण सर्वाधिक कोणत्या कारणामुळे होतं? ICMR च्या अहवालात माहिती समोर
मॅकिन्सेच्या अहवालानुसार, जगातील 68 टक्के संपत्ती रिअल इस्टेटमध्ये आहे. उर्वरित इंफ्रास्ट्रक्चर, मशीनरी अँड इक्विवपमेंट, इंटलेक्चुअल प्रॉपर्टी आणि पेटेंट्समध्ये आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.