मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अखेर चीनने सत्य स्वीकारले! कोरोनापेक्षाही ड्रॅगनची स्थिती वाईट; उपचार-औषधांचा मोठा तुटवडा

अखेर चीनने सत्य स्वीकारले! कोरोनापेक्षाही ड्रॅगनची स्थिती वाईट; उपचार-औषधांचा मोठा तुटवडा

अखेर चीनने सत्य स्वीकारले!

अखेर चीनने सत्य स्वीकारले!

China Covid-19 Cases Surge: एनएचसीचे शास्त्रज्ञ जिओ याहुई यांनी सांगितले की, अनेक शहरांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत असताना गंभीर प्रकरणे वाढत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बीजिंग, 7 जानेवारी : चीनमध्ये कोविड-19 च्या वाढत्या केसेसमुळे परिस्थिती गंभीर होत आहे. पण, चीन सरकारने हे उघडपणे मान्य केलं नव्हतं. मात्र, आता डोक्यावरुन पाणी गेल्याने अखेर चीनने हे मान्य केलं आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रकरणांमुळे तिथली आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. कोरोना विषाणूच्या या परिस्थितीमुळे औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाशी संबंधित शास्त्रज्ञांनी सांगितले की, देशातील शहरी आणि ग्रामीण भागात संसर्गाची प्रकरणे वाढल्यामुळे आरोग्य संसाधनांची कमतरता आहे.

NHC मधील शास्त्रज्ञांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चीनमध्ये संसर्ग झपाट्याने वाढत आहे. NHC चे शास्त्रज्ञ जिओ याहुई म्हणाले की, अनेक शहरांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत असताना गंभीर प्रकरणे देखील वाढत आहेत आणि वसंतोत्सवादरम्यान लोकांची संख्या वाढत असल्याने शहरे आणि ग्रामीण भागात संसर्गाचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे वैद्यकीय संसाधनांवर ताण येऊ शकतो.

वाचा - गरोदरपणात हेअर डाय वापरताय? मग हे दुष्परिणाम तुम्हाला माहिती असायलाच हवे

चीनमध्ये रुग्णालये आणि स्मशानभूमी तुडूंब

चीनला सध्या कोविड संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागत आहे. संसर्गाबाबत अधिकृत माहिती नसल्यामुळे, लाटेच्या गंभीरतेचा अंदाज लावणे कठीण आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या आकडेवारीबाबत चिंता व्यक्त केली आहे. सर्व संकेतांनुसार, डिसेंबर 2019 मध्ये साथीचा रोग सुरू झाल्यापासून चीनने प्रथमच आरोग्य संसाधनांमधील कमतरता उघड केल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे दिसते. अहवाल सूचित करतात की चीनमधील रुग्णालये आणि शवागारे तुडूंब भरली आहेत.

चीनमध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला 'झिरो कोविड पॉलिसी' अंतर्गत निर्बंध हटवल्यामुळे संसर्गाची ही सध्याची लाट आली आहे. वास्तविक, निर्बंध शिथिल होण्यापूर्वीच चीनमध्ये प्रकरणे वाढत होती. या प्रकरणांमध्ये आणखी वाढ होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: China