Home /News /videsh /

Corona in China: चीनमध्ये एका दिवसात कोरोनाचे नवे 5000 रुग्ण; 5 कोटी नागरिक लॉकडाउनमध्ये

Corona in China: चीनमध्ये एका दिवसात कोरोनाचे नवे 5000 रुग्ण; 5 कोटी नागरिक लॉकडाउनमध्ये

चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या अनेक लाटा येऊन गेल्या आहेत; पण फेब्रुवारी 2020 नंतर इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण कधीही आढळले नव्हते. अर्थात आताच्या या लाटेत अजूनपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही अशी माहिती आहे.

बीजिंग, 15 मार्च : कोरोनामुळे (Corona) संपूर्ण जग हादरून गेलं होतं. चीनमधूनच (China) कोरोनाच्या संसर्गाची सुरुवात झाली होती; पण चीननं ही गोष्ट लपवल्याचा आरोप केला जातो. आताही चीनमध्ये परत कोरोनाच्या संसर्गाची सुरुवात झाली असल्याची माहिती आहे. या संसर्गामुळे चीनमधली परिस्थिती बिघडत (Corona Situation Worsended) चालल्याचाही आरोप होत आहे. इतकंच नाही, तर चीनमध्ये गेल्या 24 तासांत 5 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. हा नवा उच्चांक आहे. ‘आज तक’नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. चीनमध्ये एकाच दिवसात पाच हजार नवे कोरोना रुग्ण आढळल्याने शांघायमधल्या (Shanghai) व्हायरोलॉजिस्टनी धोक्याचा इशारा दिला आहे. ही वेळ खोटं बोलण्याची नाही, तर महामारीच्या विरोधात रणनीती तयार करण्याची आहे, अशी स्पष्ट सूचना व्हायरोलॉजिस्ट्सनी दिली आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या अनेक लाटा येऊन गेल्या आहेत; पण फेब्रुवारी 2020 नंतर इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण कधीही आढळले नव्हते. अर्थात आताच्या या लाटेत अजूनपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही अशी माहिती आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार चीनमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 5280 रुग्ण आढळले आहेत. त्याआधी एका दिवशी 1337 रुग्ण आढळले होते. कोरोनाच्या या लाटेत चीनमधल्या जिलिन प्रांतात (Gelein Province) सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनाची ही वाढती रुग्णसंख्या पाहता चीनच्या अनेक प्रांतांमध्ये पुन्हा लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आलं आहे. 5 कोटींपेक्षाही जास्त नागरिक घरांमध्येच बंदिस्त झालेत. यात सगळ्यांत जास्त म्हणजे 2.4 कोटी नागरिक जिलिन प्रांतातले आहेत. त्यानंतर शेनजेनमध्ये 1.75 कोटी, तर डोंगुआनमध्ये 1 कोटी नागरिक लॉकडाउनमध्ये आहेत अशी माहिती आहे. सध्या चीनमधली ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचा इशारा साथरोगतज्ज्ञ आणि व्हायरोलॉजिस्ट (Infectious Disease ) झेंग वेनहाँग (Zhang Wenhong) यांनी दिला आहे. हा काळ चीनसाठी कठीण आहे. कारण दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे महामारीचा संसर्ग झाला होता. ही वेळ खोटं बोलण्याची नाही. झीरो कोविड पॉलिसीवर चर्चा करण्याऐवजी महामारी नियंत्रणात आणण्यासाठी टिकाऊ रणनीती कशी लागू करता येईल यावर विचार व्हायला हवा, असं वेनहाँग यांचं म्हणणं असल्याचं ग्लोबल टाइम्स या चीनच्या सरकारी वृत्तपत्रामध्ये म्हटलं आहे. ओमिक्रॉन व्हॅरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी झीरो-कोविड पॉलिसी सुरू ठेवणं आवश्यक आहे; पण म्हणजे आपण सतत लॉकडाउनमध्येच राहायला हवं किंवा मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करत राहिलं पाहिजे असा याचा अर्थ नाही. त्याऐवजी महामारीच्या विरोधात एक प्रभावी आणि दीर्घकालीन रणनीती बनवण्याची गरज आहे, असं वेनहाँग यांचं म्हणणं आहे. ओमिक्रॉनमुळे (Omicron) चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचं मानलं जात आहे. चीनमध्ये ओमिक्रॉनचे सगच्या व्हॅरिएंट्समुळे Stealth Omicron (BA.2) संसर्ग वेगानं वाढत आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्याच्या सुमारास जगभरात ओमिक्रॉनमुळे संसर्ग वाढत होता; पण त्या वेळेस चीनमधली परिस्थिती नियंत्रणात होती असा दावा केला जात आहे. फेब्रुवारी महिन्यात महामारीचं प्रमाण कमी होतं; पण मार्चमध्ये मात्र संसर्ग खूप वाढला, असं त्यांच्या टीमच्या लक्षात आल्याचं झेन वेनहाँग यांचं म्हणणं आहे. फेब्रुवारी महिन्यात दररोज 200 पेक्षाही कमी रुग्णसंख्या आढळत होती; पण 1 ते 12 मार्चच्या दरम्यान मात्र दैनंदिन रुग्णसंख्या 119 वरून थेट 3 हजारांपेक्षाही जास्त झाल्याची माहिती वेनहाँग यांनी दिली आहे. चीन सातत्यानं झीरो कोविड पॉलिसीचं कौतुक करत असतो. चीनमध्ये जेव्हा कोरोनाची नवी लाट येते, तेव्हा तिथं लॉकडाउन लागू केला जातो आणि प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी होते. या वेळेसही चीनमध्ये अशीच परिस्थिती आहे. चीनमधल्या बीजिंग, शांघाय, जिलिन, शेनजेन यांसारख्या प्रांतात कडक लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. बस आणि मेट्रो सेवा बंद आहे. कोरोना रुग्ण शोधण्यासाठी मेडिकल टीम सगळ्यांची अँटिजेन टेस्ट करत आहेत. अक्षरश: रस्त्याच्या बाजूलाही या टेस्ट केल्या जातात. सगळ्यांनी कोविड टेस्ट करणं आवश्यक आहे असे बॅनर जागोजागी लावले गेले आहेत. एकही घर किंवा एकही व्यक्ती यातून सुटता कामा नये, अशी स्पष्ट सूचना यात दिलेली आहे. या वेळेसही खरी माहिती लपवण्याचाच चीनचा प्रयत्न आहे.
First published:

Tags: China, Corona, Corona vaccine

पुढील बातम्या